Velhe taluka officially renamed as Rajgad in Pune district, honoring Shivaji Maharaj’s first capital fort. Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण आता ‘राजगड’, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Velhe taluka renamed, Rajgad taluka : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या या तालुक्याला आता नवीन ओळख मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता "राजगड" असेल.

  • राजगड किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

  • 70 पैकी 58 ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेने ठराव मंजूर केला.

  • केंद्र सरकार मान्यता देऊन महाराष्ट्र सरकारकडून राजपत्र लवकरच जारी होणार.

Velhe taluka renamed as Rajgad in Pune district : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे राज्य सरकारने बदलले आहे. आता वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे असणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. लवकरच याबाबत महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे, त्यामुळे तालुक्याचे नाव बदलून राजगड असे करण्यात आल्याचे म्हटले जातेय.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आला आहे.

लवकरच महाराष्ट्र सरकारकडून याबाबत राजपत्र जारी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला सन्मान देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांच्या गोटातून येत आहे. हा बदल स्थानिक नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करेल, असेही म्हटले जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT