Maharashtra Government 4 Major Decisions For Maratha Students Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Government : सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी ४ GR जारी; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Government News GR For Student : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा, कुणबी आणि SEBC विद्यार्थ्यांसाठी ४ महत्त्वाचे GR जारी केले आहेत. जाणून घ्या सविस्तर

Alisha Khedekar

  • मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

  • सरकारकडून ४ GR जारी

  • मराठा, कुणबी आणि SEBC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आदेश

मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या आंदोलनाचा १० वा दिवस आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारकडून एकाच वेळी ४ GR जारी करण्यात आले असून, या निर्णयांचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. सरकारने मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती, वसतिगृह भत्त्यासाठी निधी, परदेशी शिष्यवृत्ती धोरण, तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण असे निर्णय घेतले आहेत. जाणून घ्या या निर्णयांबद्दल सविस्तर

मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती

तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) राज्यातील सर्व विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना निर्देश दिले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि उपलब्ध सोयी-सुविधांचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला हा निधी संबंधित विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.

सारथी परदेशी शिष्यवृत्ती धोरण

सारथीमार्फत दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या धोरणातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता परदेशी विद्यापीठांची शिक्षण फी थेट संस्थेला अदा केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमेवरील कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी १५०० अमेरिकन डॉलर, तर यूकेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना ११०० जीबीपी अतिरिक्त निर्वाह किंवा आकस्मिक भत्ता मिळणार आहे. शिष्यवृत्तीसाठी QS Ranking वर आधारित नवीन गुणवत्ता यादी पद्धतीही लागू करण्यात आली आहे.

१,४४० तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण

सारथी संस्थेने IDTRS पिंपरी-चिंचवडसोबत सामंजस्य करार करून १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांसाठी LMV, HMV ड्रायव्हिंग तसेच कंडक्टर प्रशिक्षणाचा कार्यारंभ आदेश जारी केला आहे. हे प्रशिक्षण १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. प्रशिक्षणानंतर किमान १,००० लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्याची अटही ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या चार निर्णयांमुळे मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT