Sachin Tendulkar Latest News Twitter/@ANI
मुंबई/पुणे

Sachin Tendulkar News: "मला बॅटवर स्टिकर्स लावण्यासाठी तंबाखू कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली होती"

Sachin Tendulkar Latest News: राज्य सरकारकडून सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sachin Tendulkar Latest News: मी १६ व्या वर्षे भारतीय क्रिकेट संघात खेळलो. त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्याकडून वचन घेतले की तू कधीच तंबाखूचे जाहिरात करणार नाही. आजपर्यंत मी ते वचन पाळत आलो आहे. अशी जुनी आठवण मास्टर ब्लाटर सचिन तेंडुलकर यांने सांगितली. राज्य सरकारने मौखिक आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी स्वच्छ मुख अभियानाची सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

यासाठी राज्य सरकारकडून सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात आज मुंबईत एक कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना सचिन तेंडुलकरनं गुटखा, तंबाखू अशा गोष्टींपासून लांब राहण्याचं आवाहन उपस्थितांना केलं.

राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दाखवली. यावेळी सचिन तेंडुलकरनं त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली. (Breaking Marathi News)

काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

मी जेव्हा भारतासाठी खेळायला लागलो, तेव्हा माझ्या बाबांनी (रमेश तेंडुलकर) माझ्याकडे एक वचन मागितले होते. तू कधीच तंबाखूचे प्रमोशन अथवा जाहिरात करणार नाहीस, असे मला वचन दे. ते वचन मी आजतागायत पाळले, असे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले.

"बॅटवरील स्टिकर्ससाठी तंबाखू कंपन्यांनी ऑफर दिली होती"

पुढे बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला, मी देशासाठी खेळायला लागल्यावर माझ्याकडे बऱ्याच ऑफर्स आल्या (तंबाखूच्या) अनेक कंपन्यांनी मला भरपूर पैसे ऑफर केले, पण मी कधीच त्यांची ऑफर स्वीकारली नाही. माझ्या बॅटवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कंपनीचा लोगो असायचा, पण दोन वर्ष बॅटवर कोणताही लोगो नव्हता. कारण तेव्हा मला तंबाखू कंपन्यांनी ऑफर दिली होती, त्यांच्या स्टिकर्स बॅटवर लावण्यासाठी मला कोट्यवधी रुपये ऑफर करण्यात आले, पण मी ते कधीच स्वीकारले नाही, असंही सचिनने कार्यक्रमात सांगितले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT