राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. रश्मी शुक्ला यांनी महासंचालकपदाचा पदभार स्वीकारून १ महिना झाल्यानंतर जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. ' जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे, असा संदेश रश्मी शुक्ला यांनी राज्यतील नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना दिला आहे. (Latest Marathi News)
मुंबईत काल ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचदरम्यान, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे पत्र चर्चेत आले आहे. 'पोलीस कर्मचाऱ्यांकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये आमच्याकडून खपवून घेतली जाणार नाहीत, असा संदेश रश्मी शुक्ला यांनी दिला आहे.
रश्मी शुक्ला म्हणाल्या की, 'मी आतापर्यंत जे पाहिले आहे, अनुभवले आहे, त्यावरून मला खात्री आहे की, महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे.भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'आम्ही तुम्हाला खात्री देतो की, सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील.केंद्रीय पोलीस दलाचे नेतृत्व करताना मिळालेल्या अनमोल अन्भव गाठीशी घेऊन मी राज्यात परतले आहे. सर्व पोलीस कर्मचायांमध्ये व्यावसायिक आणि उच्च दर्जाच्या वागणुकीचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेही त्या म्हणाल्या.
'येत्या कालावधीत तुमच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी तुमच्याशी थेट संपर्क साधण्यास उत्सुक आहे. तोपर्यंत आपण मला पाठिंबा द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. कारण आपण सर्व एकत्रितपणे या नवीन अध्यायाला सुरुवात करत आहोत. जिथे प्रत्येकजण निर्भयपणे जगू शकेल, काम करू शकेल आणि भरभराट करू शकेल, असा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही अविरत कार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.