Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर 'तो' उत्साह दिसला नाही; अजित पवारांची तुफान फटकेबाजी

शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ठरावाच्या विरोधात ९९ मते पडली. यानंतर राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी विरोधकांवर फटकेबाजी करत टीका केली. 'देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर तो जोश आज दिसला नाही, तो उत्साह पहिल्यासारखा दिसला नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले, तुमचा जोश मी पाहिला आहे, तुमच भाषण सगळी शांतपणे ऐकत असायचे. आज तुम्ही एकनाथ शिंदे कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस नशिबवान आहेत. यावेळी अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते पण झाले आणि उपमुख्यमंत्रीसुध्दा झाले, त्यामुळे ते नशिबवान आहेत. त्यांनी सर्व महत्वाच्या पदावर या पाच वर्षात काम केले, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सत्ता येते सत्ता जाते कुणीही आता सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही. मी तुमचे भाषण ऐकले तुम्ही शिंदे यांचे कौतुक केले. मग तुम्ही मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त खाती का दिली नाहीत. अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचे काम राज्यपाल यांनी केले आहे. आता राज्यपाल एकदम फास्ट झाले आहेत. ते आता सगळे निर्णय लगेच घेत आहेत, असा टोला पवार यांनी राज्यपाल यांनाही लगावला. आम्ही म्हणत होतो तेव्हा अध्यक्षांची निवड केली नाही. आता लोक यावर शंका उपस्थित करत आहेत, असा आरोपही अजित पवार (Ajit Pawar) केला.

देवेंद्र फडणवीसांनी 'त्या' अदृश्य हातांचे मानले आभार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार फटकेबाजी केली. 'ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, त्यांचे आभार तर मानतोच. तर अप्रत्यक्षपणे ज्या सदस्यांनी हा प्रस्ताव प्रचंड मताने पारीत व्हावा याकरिता बाहेर राहून मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

आईला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवताना पाहिलं; मुलीचा गळा आवळून विहिरीत फेकलं, कलयुगी आईचा प्रताप

Virar Building Collapse: विरारमध्ये 40 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला अन् पुढे काय घडल? VIDEO

Dhule Accident : भीषण अपघात; ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने ट्रक अनियंत्रित, दोघांचा मृत्यू

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

SCROLL FOR NEXT