Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

'एकनाथ शिंदे माघार घ्या, तुम्हाला महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल'

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन केलं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 'एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेनेचा रक्तपात होईल. यामध्ये शिवसैनिक घायाळ होतील. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना (Shivsena) संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल' असं भावनिक आवाहन भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एकनाथ शिंदे यांना केलं. (Eknath Shinde Latest News)

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधासभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे भावविक आवाहन केलं आहे. 'एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे'. असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

'तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल' असंही भास्कर जाधव म्हणाले. 'संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं. संजय राठोड यांचं काय करणार आहात? यामिनी जाधव यांची चौकशी लावली, आज त्यांनाचा सुरक्षा दिली जात आहे', अशी विचारणाही भास्कर जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केली.

'पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार'

भास्कर जाधव यांनी विधानसभेत भाषण करताना, नवीन सरकारवर टीकेचा भडीमार केला. 'पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरु आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, भोंगा दिला, नुपूर शर्मा, कंगना आणलीत. पण सत्ता उलटली नाही', असं भास्कर जाधव यांनी सुनावलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT