काय झाडी काय डोंगार..., शहाजीबापू थोडं सांभाळून; अजितदादांची तुफान बॅटिंग

अजितदादांनी बंडखोर आमदारांनाही टोले लगावले.
Ajit Pawar Vs Shahji Bapur patil
Ajit Pawar Vs Shahji Bapur patilSaam Tv
Published On

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहातील आमदारांचे आभार मानले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार भाषण केलं.अजित पवार यांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये भाषण करत शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढले. (Ajit Pawar Latest News)

Ajit Pawar Vs Shahji Bapur patil
माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेणार; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले वाचा...

अजितदादांनी बंडखोर आमदारांनाही टोले लगावले. यावेळी त्यांनी काय डोंगार, काय झाडी, काय हाटील म्हणणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही सुनावले. आपण एकाचवेळी निवडून आलो. पाच पाच लाख लोकांचं आपण नेतृत्व करतो, असं सांगत गोव्यात नाचणाऱ्या आमदारांनाही अजितदादांनी फटकारलं. (Shahaji Bapu Patil News)

शिवसेना नेमकी काय आहे हे सांगतानाच बंडखोर करणारे पुन्हा कधीच निवडून येत नाहीत. हा शिवसेनेचा (shivsena) इतिहास आहे. शिवसैनिक नेहमीच ठाकरे कुटुंबाच्या पाठी राहिली आहे, असं सांगतानाच त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांची उदाहरणे देत बंडखोरांना घाबरवून सोडले.

Ajit Pawar Vs Shahji Bapur patil
देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर 'तो' उत्साह दिसला नाही; अजित पवारांची तुफान फटकेबाजी

'मी काम करताना भेदभाव सहसा करत नाही'

अजित पवार म्हणाले, “मी आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना कुणाला बोललो नव्हतो. मात्र, आज मला सांगायचं आहे की भाजपासोबत गेल्यावर महाविकासआघाडी अनैसर्गिक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला असा पाढा वाचण्याचं काम केलं. वास्तविक देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या इतर सर्व नेत्यांना माहिती आहे की मी काम करताना असा भेदभाव सहसा करत नाही. मी अर्थमंत्री असताना 1 कोटी आमदार निधी मी 2 कोटी केला. आघाडी सरकार आल्यावर 3 कोटी केला. दुसऱ्या वर्षी 4 कोटी, आता 5 कोटी केला. अजिबात भेदभाव केला नाही. 288 आमदारांना सर्व पैसे मिळाले पाहिजे.”

Ajit Pawar Vs Shahji Bapur patil
माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेणार; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले वाचा...

'देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर 'तो' उत्साह दिसला नाही'

पुढे बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर तो जोश आज दिसला नाही, तो उत्साह पहिल्यासारखा दिसला नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले, तुमचा जोश मी पाहिला आहे, तुमच भाषण सगळी शांतपणे ऐकत असायचे. आज तुम्ही एकनाथ शिंदे कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस नशिबवान आहेत. यावेळी अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते पण झाले आणि उपमुख्यमंत्रीसुध्दा झाले, त्यामुळे ते नशिबवान आहेत. त्यांनी सर्व महत्वाच्या पदावर या पाच वर्षात काम केले, असंही अजित पवार म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com