Pune Politics Saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर; भाजपचा पुण्यात 'आनंदोत्सव'

Pune Political News : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पुण्यात 'आनंदोत्सव' सुरु असल्याचं पाहायला मिळालं.

Akshay Badve

मराठवाडा, सोलापूरमध्ये पूरस्थितीने शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतलाय

दुसरीकडे पुण्यात भाजपकडून जीएसटी सुधारणा निर्णयाचा ‘आनंदोत्सव’

नागरिकांनी या कार्यक्रमाच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केलीये

राज्यातील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आणि सोलापूर मध्ये पूरस्थिती सारखी संवेदनशील परिस्थिती असताना पुणे शहर भाजपकडून मोदी सरकार ने जी एस टी च्या धोरणांमध्ये बदल केल्याबद्दल चक्क "आनंदोत्सव" साजरा करण्यात आला.

मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मराठवाड्यातील पुरामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. इतकचं नव्हे तर हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालंय. गेल्या ४ दिवसांच्या मुसळधार पावसाने मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान तर झालंच पण या पावसाने अनेकांचे घर संसार उघड्यावर आले.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राज्याच्या कॅबिनेट बैठकीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना थेट "फील्ड" वर जाण्याचे आदेश दिले. राज्य सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार असे आश्वासन सुद्धा दिलं.

आज मुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आज मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात 'ऑन फील्ड" जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर अणू संपूर्ण मदत दिली जाईल असे आश्वासित केले.

राज्यातील काही जिल्ह्यात गंभीर परिस्थिती असताना पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जी एस टी च्या धोरणांमध्ये बदल केल्याबद्दल "आनंदोत्सव". सायंकाळी ५.३० वाजता पुण्यातील लक्ष्मी रोड वरील शगुन चौकात या "उत्सवाचे" आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी "धन्यवाद, मोदी सरकार" अशा घोषणा सुद्धा दिल्या.

यावेळी माध्यम प्रतिनिधी यांनी राज्यातील पूरस्थिती असताना या "आनंदोत्सव" बद्दल प्रश्न विचारला असता "हा आनंदोत्सव नव्हे तर जनतेशी संवाद साधण्यासाठी आम्ही आलो असल्याचं" भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर दिलं. विशेष म्हणजे भाजपच्या शहर माध्यम समन्वयक यांच्याकडून या "आनंदोत्सव" चा आमंत्रणाचा निरोप दिवसातून ३ वेळा अनेकांपर्यंत पोहचला होता.

आता याच कार्यक्रमावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी झालेल्या निर्णयानंतर ४ दिवसांनी हा कार्यक्रम का आयोजित केला? जर "आनंदोत्सव" करायचा होताच तर आणखी काही दिवस जाऊ दिले असते आणि नंतर केला असता तर? राज्यातील अनेक मंत्र्यांनी त्यांचे पूर्वनियोजित दौरे रद्द केले आहेत तर मग हा कार्यक्रम का? भाजपच्या कार्यकर्त्यांच्या संवेदना संपल्या आहेत का? असे अनेक प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT