Covid 19 In Maharashtra SAAM TV
मुंबई/पुणे

Covid 19 In Maharashtra: सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण हजारांपल्याड, ताज्या अहवालानं महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं!

Maharashtra Corona Cases: राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल १ हजार ११३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे ३ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Covid 19 In Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल १ हजार ११३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे ३ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.  (Latest Marathi News)

मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील (Dombivali) एका रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णाचे वय ८२ वर्षे होते. मार्च महिन्यात रुग्णाच्या मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर १६ एप्रिल रोजी त्याला ताप आला. १७ एप्रिल रोजी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ एप्रिल रोजी त्याला उपचार करुन घरी सोडण्यात आले.

घरी गेल्यानंतर त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या वैद्यकीय अहवालात तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतर पुन्हा कोरोना वाढत असताना डोंबिवलीत एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा जागी झाली आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात आढळून आलेल्या १,११३ नवीन रुग्णांपैकी २०७ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. मुंबईत २२ मार्चपासून सक्रिय रुग्णांच्या वाढीचा आलेख उंचावला आहे. वर्षअखेरीस मे महिन्यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या वाढून पाच ते सहा हजारच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याचा दैनंदिन सकारात्मकता दर ६% वर घसरला आहे. तर मुंबईचा ११% आहे. परिणामी राज्यात ६,१२९ कोरोना रुग्णसंख्या आहे तर शहरात १,५२४ सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आढळून आली आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची (Corona Cases) वाढती संख्या पाहता मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय मंत्री गिरीष महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तसेच परिचारिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले, गरोदर महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

SCROLL FOR NEXT