Corona Virus In Maharashtra  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Lockdown : राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात टाळेबंदी लागू केली जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

सूरज सावंत

Corona Virus In Maharashtra : चीनसह अन्य देशांत पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जगभरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट झालं असून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून (२३ डिसेंबर) मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात टाळेबंदी लागू केली जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. (Corona Latest News)

काय म्हणाले तानाजी सावंत?

आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी साम टिव्हीसोबत संवाद साधला. यावेळी कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावला जाणार का? असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तानाजी सावंत म्हणाले, राज्यात कोरोना आला तरी लॉकडाऊनची शक्यता नाही. सध्या तरी मास्क वापरण्याची सक्ती केलेली नाही. पण नागरिकांनी मास्क वापरावे असे आवाहन आम्ही करत आहोत.

पुढे बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यातील आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या तसेच योग्य त्या उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.  (Latest Marathi News)

कोरोनाशी लढण्यासाठी राज्याची तयारी किती? याबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. रुग्णालयीन व्यवस्था नीट ठेवावी त्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

- महाराष्ट्रात फक्त १३२ रुग्ण आहेत.

- वेन्टिलेटर आणि ऑक्सिजन बेड तयार ठेवलेले आहेत.

- कोविड प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहे.

- चार परदेशातून येणाऱ्या नागरिकाची थर्मल टेस्ट केली जाणार.

- नवीन टार्स फोर्स नेमण्यात आलेली आहे, ती डॉ. ओक यांच्या नेतृत्वाखाली नेमणार आहे.

- रॅली आणि मोर्चावर अद्यापतरी बंदी नाही.

- इतकही घाबरण्याचं कारणं नाही पण आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.

- चीन, सिंगापूर, मलेशिया, कॅनडा, डेन्मार्क या देशातून येणाऱ्यांची थर्मल टेस्ट होणार.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या ५ ठिकाणी थांबलात तर आयुष्य थांबेल; चाणक्यांनी सांगितलेले मार्ग डोक्यात फिट्ट करून घ्या!

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

SCROLL FOR NEXT