Tanaji Sawant : 'ओमिक्रॉन' की ‘एमिक्रॉन’, व्हेरिएंटचं नाव घेताना आरोग्यमंत्र्यांची फजिती; पाहा VIDEO

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांना व्हेरिएंटचं नावही नीट घेता आलं नाही.
tanaji sawant news
tanaji sawant newsSaam TV

Tanaji Sawant News : गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चीनमधील रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलं आहे. चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ-७ या सब-व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. भारतातही या व्हेरिएंटचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांना व्हेरिएंटचं नावही नीट घेता आलं नाही. (Latest Marathi News)

tanaji sawant news
Navneet Rana : खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ; कोर्टाचे पोलिसांना महत्वाचे आदेश

‘ओमिक्रॉन’ऐवजी ‘एमिक्रॉन’ असा उल्लेख

आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना पत्रकारांनी चीनमध्ये थैमान घालणाऱ्या बीएफ-७ च्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला. यावेळेस उत्तर देताना सावंत यांनी ओमायक्रॉनचा उल्लेख ‘एमिक्रॉन’ असा केला. त्यानंतर आपला उच्चार चुकल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना या व्हेरिएंटचं नेमकं नाव काय आहे हे नजर आणि देहबोलीमधूनच विचारलं. त्यावर सहकाऱ्यांनी ‘ओमिक्रॉन… ओमिक्रॉन…’ असं म्हणत मदत केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना या व्हेरिएंटचं बरोबर नाव घेता आलं.सावंतांनी ओमिक्रॉनच्या ऐवजी ‘एमिक्रॉन’ असा उच्चार केला अन् स्वत:च थांबून अधिकाऱ्यांना नेमका शब्द विचारला. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

tanaji sawant news
Corona Virus : कोरोनाने धडकी भरवली! राज्यातील अनेक मंदिरात आजपासून मास्क सक्ती, वाचा नियमावली

महाराष्ट्र सरकार अलर्टवर

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारपरिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीबाबची माहिती दिली. ते म्हणाले, बीएफ ७ हा नवीन व्हेरिएंट आला आहे. भारतात त्याचे ४ रुग्ण असले तरी महाराष्ट्रात BF.7 या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाही, तरिही आरोग्य खात्याची बैठक याबाबत बोलवून त्यांना सजग केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण काळजी घेणं गरजेचं आहे असं सावंत म्हणाले आहेत. (Corona Latest News)

पुढे ते म्हणाले, वृद्धांनी मास्क लावावेत, गर्दी करू नये, केंद्रानेही काही गाईडलाईन दिले आहेत. हा नवीन व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात फोफावतो. सध्या मास्कची सक्ती नाही, मात्र आजारी असलेल्या व्यक्तींनी मास्क लावावेत असं आवाहन यावेळी तानाजी सावंत यांनी केलं. सोबतच प्रयोग शाळेत आरटीपीसीआर वाढवावे आणि लसीकरणावर भर असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com