Mallikarjun Kharge Saam TV
मुंबई/पुणे

Mallikaarjun Kharge: डर के बाद भी लढेंगे और जितेंगे, मतभेद असतील पण एकत्र या.. मल्लिकार्जुन खरगेंची कार्यकर्त्यांना साद

Maharashtra Congress News: लोणावळ्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आज पार पडत आहे. या शिबिराचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उद्घाटन केले

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी|ता. १६ फेब्रुवारी २०२४

Maharashtra Congress Training Camp Lonavala:

लोणावळ्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आज पार पडत आहे. या शिबिराला प्रदेशअध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत. या शिबिराचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उद्घाटन केले तसेच मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी कामाला लागण्याचे आदेश दिले.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?

"योग्य वेळी महाराष्ट्र काँग्रेसने या शिबिराचे आयोजन केले आहे. निवडणुकीची रणनिती, पक्षाची मूल्य आणि महत्त्व या शिबिरातून पोहचायला हवीत. काँग्रेस पक्ष मुंबईत तयार झाला आहे. काँग्रेस नेहमी एकता आणि संविधान सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. मुंबईत जर काँग्रेस जिंकली तर महत्त्वाचा टप्पा मानला जाईल, लोकसभा निवडणूक सगळ्यांनी एकत्र येऊन लढायची आहे, " असे आवाहन मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

डर के बाद भी लढेंगे ओर जितेंगे!

"ज्या लोकांना पक्षाकडून सगळं मिळतं ते लोकं घर सोडून जातात. मोदींनी १० वर्षात काय केलं तुम्हाला माहिती आहे, ते खोटं बोलतात. लोकं अजूनही जर मोदींसोबत गेले तर देश धोक्यात येईल आणि संविधान संपून जाईल, अशी भिती व्यक्त करत डर के बाद भी लढेंगे ओर जितेंगे," असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मतभेद असतील पण एकत्र या...

"मोदीजी नेहमी गॅरंटी देतात आणि प्रत्येक वेळा "मी, मी म्हणजे नेहमी मीपणा होताना दिसतो. ते नेहमी खोटं बोलतात. लोकशाही साठी आता एकत्र या काही लोकांमध्ये मतभेद असतील पण आता एकत्र या. बूथबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही जर आता घरोघरी गेला नाहीत, तर निवडणुका जिंकू शकणार नाहीत, जे प्रामाणिकपणे काम करतील आणि चांगले व्यक्ती असतील त्यांनाच ही बूथ पोलिंग आणि ब्लॉक लेव्हल चे कामं द्या," अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT