Ajit Pawar Oath ceremony  Saam tV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Portfolio Delay : अजित पवारांसह 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला; पण का रखडलंय खातेवाटप, कुठे अडलंय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार यांनी 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली. अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची आणि इतर 8 आमदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. मात्र 10 दिवस उलटले तरी नवीन मंत्री खातेवाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र हे खातेवाटप नेमकं कुठे अडलंय, असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे.

अजित पवार गटाला वाटाघाटीत ठरलेली खाती मिळत नसल्याने खातेवाटप रखडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपने त्यांना ज्या खात्याबाबत आश्वासन दिले होते ती खाती मिळत नसल्याने अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

अजित पवार गटाला अर्थ , गृह, जलसंपदा ही खाती देण्यास शिंदे गट आणि भाजपकडून विरोध होत आहे. याऐवजी महसूल किंवा ऊर्जा खाते देण्याची तयारी शिंदे आणि भाजपने दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांकडे अर्थखातं नको, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून केली जात आहे, अशीही माहिती समोर येत आहे. कारण अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांनी वेगळी भूमिका घेत बंडखोरी केली होती. (Latest Marathi News)

सध्या अर्थ मंत्रालय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे फडणवीस एवढं मोठं खातं अजित पवारांसाठी सोडतील का हाही प्रश्न आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात आता 29 मंत्री असून आणखी नवीन मंत्री त्यात सामील होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारसमोर खातेवाटपाचं मोठं आव्हान असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT