Cabinet Meeting Saam TV
मुंबई/पुणे

Cabinet Decision : विद्यार्थी, तरुण, मुंबईकरांसाठी खूशखबर; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे १८ निर्णय

Cabinet Decision (11 March 2024) : शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक असणार असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक असणार असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

याशिवाय रेसकोर्सवरील ३२० एकरावर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली २०० एकर जमीन आणि रेसकोर्सची १२० एकर जमीन अशा ३२० एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाणार असल्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १८ निर्णय घेण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  • बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार (गृहनिर्माण विभाग)

  • बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार. (गृहनिर्माण विभाग)

  • एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी (नगरविकास )

  • मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार (नगरविकास विभाग)

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र (राज्य उत्पादन शुल्क)

  • जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता (वित्त विभाग)

  • राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद (गृह विभाग)

  • एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने (कामगार विभाग)

  • विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना (विधि व न्याय विभाग)

  • राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प (नियोजन विभाग)

  • अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड (सार्वजनिक बांधकाम विभाग)

  • डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

  • मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार ( नगरविकास विभाग)

  • शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक ( महिला व बालकल्याण विभाग)

  • उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ ( ऊर्जा विभाग)

  • ६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता (आदिवासी विकास विभाग)

  • आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना (आदिवासी विकास विभाग)

  • राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता (सामाजिक न्याय विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : विजय नक्की आमचा होईल- हेमंत रासनेंच्या पत्नी

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT