Maharashtra Cabinet Expansion Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! राष्ट्रवादीला आणखी ४ मंत्रीपदे मिळणार, भाजप-शिंदे गटाला किती? वाचा...

Cabinet Expansion News: युती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असून यामध्ये १४ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion Latest News: राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार यांनी युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठींब्यामुळे युती सरकार मजबूत झालं असलं, तरी त्यांच्या एन्ट्रीने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी सुद्धा भाजप आणि शिंदे गटातील आमदारांकडून केली जात आहे.

अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet expansion) एक मोठी अपडेट समोर आली आहे. युती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असून यामध्ये १४ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला समान जागा मिळणार आहे, इंडियन्स एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

इंडियन्स एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या गटाला ४ मंत्रिपदे मिळणार आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. तर भाजप (BJP) आणि शिवसेना यांना प्रत्येकी ५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा विस्तार पार पडेल, असंही सांगण्यात आलं आहे.

युती सरकारमध्ये तिन्ही पक्षांना मिळून एकूण ४३ मंत्रिपदे मिळणार आहे. यामध्ये अजित पवार आणि शिंदे गटाला (Eknath Shinde) प्रत्येकी १४ तर भाजपला १५ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत तिन्ही पक्षांच्या २९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता १४ मंत्रिपदेच शिल्लक असून यामध्ये कुणाची वर्णी लागणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी सोमवारी मध्यरात्री गुप्त खलबतं झाली. यावेळी तिन्ही बड्या नेत्यांमध्ये तब्बल ३ तास गुप्त बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं द्यावं? याबाबत सुद्धा विचारविमर्श करण्यात आल्याचं समजतंय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT