Eknath Shinde, Devendra Fadnvis Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातून भाजपच्या बड्या नेत्याचा पत्ता कट?

आशिष शेलार यांना सुद्धा शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादी सुद्धा आता निश्चित झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18 आमदार आज शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा राजभवनात सुरू झाला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारातील पहिल्या टप्प्यात अनेक आमदारांच्या नावांचा समावेश नाहीये. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना सुद्धा शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये. (Maharashtra Cabinet Expansion LIVE Updates)

शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात गुलाबराव पाटील, संदिपान भूमरे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, शंभुराजे देसाई, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार हे आमदार शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून पहिल्या टप्प्यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा हे शपथ घेणार आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना भाजप नेते आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे. त्यामुळे आता आशिष शेलार यांच्याकडे भाजप नेमकी कोणती जबाबदारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार अशी चर्चा आहे. भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाईल, असे सांगण्यात येत आहे. एक व्यक्ती एक पद या नियमाप्रमाणे हे बदल केले जातील अशी चर्चा आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

SCROLL FOR NEXT