Eknath Shinde-Devendra Fadnavis SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: EC च्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

Eknath Shinde-Devendra Fadnavis : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Cabinet Expansion News : निवडणूक आयोगानं आज, शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे.

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी न मिळाल्यानं नाराजी दिसून आली होती. पण कोणतीही नाराजी नाही, असं वारंवार शिंदे गट आणि भाजपकडून सांगण्यात येत होतं.  (Breaking Marathi News)

तसेच, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यामुळं ठाकरे गट आणि विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत होती. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या नाराजीचा उद्रेक होऊन हे सरकार कोसळेल, असे भाकित विरोधकांकडून वर्तवण्यात येत होते. मात्र, जोपर्यंत शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे सांगितले जात होते. अखेर हा निर्णय आला आहे.

शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आता शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. त्यामुळं आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्गही मोकळा होणार?

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर आता मुदत संपलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राज्यातील लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khan Saree Blouse Designs: खण साडीचा नवा थाट! संक्रांतीला ट्राय करा 'हे' लेटेस्ट ब्लाउज पॅटर्न आणि ज्वेलरी

Gold Rate Today: मकरसंक्रांतीला सोन्याचे भाव खाल्ला; १० तोळ्यामागे १०,९०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Crime News : घरी बोलावून विद्यार्थिनीवर बलात्कार, शाळेच्या मुख्याध्यापकाचे भयंकर कृत्य; कोल्हापूर हादरले

Maharashtra Live News Update: मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील १५ उड्डाणपूल बंद

Nanded : 'तुझी बिर्याणी करून टाकू...', नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या नवऱ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT