Maharashtra Budget 2024  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Budget 2024 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून; अर्थसंकल्प कधी मांडला जाणार? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Budget update : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत होणार आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Budget Update :

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच या कालावधित राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

आज मंगळवारी विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे हे उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. या कालावधित एकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज कसं चालणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशना पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल. पुढे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल.

तसेच 2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारीला शासकीय कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी या अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; कारण काय? वाचा

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेचा छळ; विरोध करणाऱ्या भावाला झाडाला बांधले अन् बेदम मारहाण

IND vs AUS playing 11 : अर्शदीपला बाहेरचा रस्ता, कुलदीपची एन्ट्री; शुभमनची सैना क्लीन स्वीप टाळणार का?

SCROLL FOR NEXT