Maharashtra HSC result 2026 expected date and time : बारावीचा आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? (Maharashtra SSC & HSC Result Date 2026) याकडे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा खिळल्या आहेत. १० फेब्रुवारी ते १८ मार्च, या काळात बारावी आणि दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. आता बारावीच्या निकालाबाबत (HSC Result 2026 Maharashtra) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागू शकतो. तर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा (SSC Result 2026 Maharashtra) निकाल लागू शकतो. When Will Class 10 and 12 Results Be Declared
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १० फेब्रुवारी - ११ मार्च यादरम्यान पार पडली होती. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात झाली. बारावी आणि दहवाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झालेय. दरम्यान, ५ मे २०२६ पर्यंत राज्यातील बारावीचा निकाल जाहीर होईल. तर १५ मेपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दहावी बारावीचा निकाल कुठे पाहाल ?
महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून थोड्याच दिवसात निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे. mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी होते तर दहावीला १६ लाख विद्यार्थी बसले होते. आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org (१२ वी साठी)
sscresult.mkcl.org (१० वी साठी)
mahahsscboard.in
निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही वरील अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. पण निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother's Name) असणे आवश्यक आहे. how to check Maharashtra board result online 2026
अकरावीच्या प्रवेशांसाठी पाच फेऱ्या -
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होते. यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी ५ फेऱ्या असतील. तर शैक्षणिक वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार आहे. यंदा मुलींसाठी विशेष फेरी ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नव्याने सूचना आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. नियमित तीन फेऱ्या संपल्यानंतर मुलींसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाने यंदा पहिल्यांदाच गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र एकत्र आणि एकच पानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यावर विद्यार्थ्यांचा फोट आणि विशेषअसा क्युआर कोड असेल. त्या क्युआरकोडवर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असेल. बनावट गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्राचे गैरप्रकार कायमचे बंद करण्यासाठी बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पहिल्यांदाच हा बदल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.