Konkan Division Has Highest 12th Board Exam Result Know 5 Features of These Maharashtra HSC Result 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra 12th Result 2024: बारावीत यंदाही कोकण विभागाची बाजी, मुंबईचा निकाल सर्वात कमी; वाचा निकालाची ५ महत्वाची वैशिष्ट्ये

Maharashtra Board HSC Exam Result 2024: यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यातील एकूण ९३. ३७ विद्यार्थी उतीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला. तर मुंबई विभागात कमी विद्यार्थी पास झाले.

Satish Daud

सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यातील एकूण ९३. ३७ विद्यार्थी उतीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला. तर मुंबई विभागात सर्वात कमी विद्यार्थी पास झाले.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. निकाल नेमका काय लागणार, याची पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता लागली होती.

यंदाही बारावी परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली. राज्यात ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० इतकी आहे. दरम्यान, बारावीची निकालाची ५ मोठी वैशिष्ट्ये समोर आली आहे. ती कोणती जाणून घेऊयात सवित्तर

बारावी परीक्षेच्या निकालाची महत्वाची वैशिष्ट्ये

  • राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला.

  • सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा ९७.५१ टक्के लागला.

  • सर्वात कमी निकाल मुंबई विभाग ९१.९५ टक्के लागला आहे.

  • राज्यात मुलींचा निकाल सर्वाधिक लागला. ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.

  • मुलींच्या तुलनेत मुलाचा निकाल कमी लागला ९१ .६० टक्के मुले पास झाली.

  • मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ टक्क्यांनी जास्त आहे.

  • एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

  • विज्ञान विभाग निकाल ९७.८२ टक्के, तर कला शाखा निकाल ८५.८८ टक्के लागला.

  • वाणिज्य विभाग निकाल ९२.१८ टक्के, तर व्यवसाय अभ्यासक्रम ८७.२५ टक्के लागला.

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा बारावी परीक्षेचा निकाल २.१२ टक्क्यांनी जास्त लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर

Diabetes Care: डायबेटीज झालाय? भात खाणं सोडू नका, डॉक्टरांनी सगळ्या शंका केल्या दूर... वाचा नेमकं काय सागितलं

Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्यासाठी कोणता योगा करावा? जाणून घ्या

Reduce sugar intake: तुमच्या आहारातून शुगर इंटेक कसा कमी कराल? पाहा सोपे मार्ग

Terror Attack : लग्नात दहशतवादी हल्ला, ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी, भारताचा शेजारी देश हादरला

SCROLL FOR NEXT