डोंबिवली: लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी कल्याण-शिळ रोडवरील मानपाडा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने केली आहे. देशातील वाढती महागाई आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा चौकात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मानपाडा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. (Maharashtra Bandh: NCP Youth Congress blocked roads protest on Kalyan-Shil Road)
हे देखील पहा -
दुसरीकडे कल्याण-शिळ रोडवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रस्ता रोखो केला. यावेळीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. तर डोंबिवली पश्चिमेला काँग्रेस पक्ष आणि लालबावटा संघटनेकडून निषेध केला गेला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये कल्याण डोंबिवली काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि लालबावटा या राजकीय पक्ष आणि संघटनांनी संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे कालच जाहीर केले होते. त्यानूसार आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कल्याण-शिळ रोड वरील मानपाडा चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने सुरू केली. तर 10.30 वाजण्याच्या सुमारास कल्याण-शिळ रोडवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रस्ता रोखो केला. यावेळी कार्यकर्ते मोठया प्रमाणात रस्त्यावर उतरले होते.
दरम्यान या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच डोंबिवली पश्चिमेला काँग्रेस पक्ष आणि लालबावटा संघटने कडून निषेध केला गेला. तर गोळवली चौकात आणि टाटा पावर येथे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केंद्र सरकारचा निषेध करत सांगितले की, केंद्रीय राज्यमंत्री याच्या मुलाला फासावर लटकवावे अशी मागणी केली. डोंबिवलीत विविध ठिकणी आंदोलन दत्ता वझे, गुलाब वझे, गजानन मांरुळकर, सुधीर पाटील, संतोष केणे आणि काळू कोमस्कर यांनी केले.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.