महाराष्ट्र बंद: देशाच्या शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढतोय - संजय राऊत Saam Tv News
मुंबई/पुणे

महाराष्ट्र बंद: देशाच्या शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढतोय - संजय राऊत

महाराष्ट्र बंद: शेतकऱ्यांना चिरडणारी जीप महाराष्ट्रात कोणाकडे असेल तर त्यांनी ती रस्त्यावर आणावी असं आव्हान संजय राऊतांनी केलं आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथ शेतकऱ्यांच्या शांतीपुर्ण आंदोलनात शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चढवल्या गेल्या होत्या. यात ४ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याविरोधात महाविकास आघाडीने राज्यात आज बंद पुकारला आहे. हा बंद सुरु झाला असून हा बंद शंभर टक्के यशस्वी होणार असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. (Maharashtra Bandh: Maharashtra is fighting the battle of the country's farmers - Sanjay Raut)

हे देखील पहा -

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र बंद सुरु झालेला आहे आणि या महाराष्ट्र बंदकडे देशातला शेतकरी अपेक्षेनं बघतोय. देशाच्या शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढतोय. गेले दोन वर्ष गाझीपुरच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत. ऊन, वारा, पावसात बसले आहेत. ४०० पेक्षा जास्त शेतकरी आंदोलनात मरण पावले आहेत. भाजपच्या राज्यामध्ये हरियाणात शेतकऱ्यांची डोकी फोडली, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं. अशा परिस्थितील देशातला शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेला समाज आपल्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं बघतोय. त्यामुळे महाराष्ट्राने शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी हा बंद सुरु केला आहे.

भाजप गतिरोधक असता तर लखीमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांना ज्या जीपने भाजपच्या मंत्री पुत्राने शेतकऱ्यांना चिरडलं ती जीप थांबली असती. या सरकारला गतिरोधक नाही म्हणून ती बेफाम आणि बेबंद पळत सुटली, गरीब सामान्य शेतकऱ्यांना चिरडत सुटले आहेत. कुठे स्वतःच्या गाड्यांखाली तर कुठे महागाई डिझेल आणि पेट्रोलच्या भाव वाढीमध्ये सर्वसामान्य चिरडले जात आहेत. जर कुणी आमचा बंदला पाठिंबा नाही असं म्हणत असेल तर त्यांनी तपासून पहावं की, ते या देशाचे खरंच नागरिक आहेत का, आपण शेतकऱ्यांचं काही देणं लागतो का, हे स्वतःला विचारुन पहावं. हा बंद मोडून काढला पाहिजे असं जर कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. जर कोणी म्हणत असेल की आम्ही रस्त्यावर येऊ तर त्यांनी उतरून दाखवा. जसं लखीमपुर खेरीमध्ये त्या मंत्रीपुत्रांने शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला जीप गाडीच्या माध्यमातून अशी जीप गाडी महाराष्ट्रात कोणाकडे असेल तर त्यांनी ती रस्त्यावर आणावी. लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे हा बंद १००% यशस्वी होणार असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत राऊत म्हणाले की, षण्मुखानंद हॉलमध्ये दसरा मेळावा होईल. त्याच जोरात त्याच जोशात व्यवस्थित होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील देशाचा राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT