Mumbra Crime Saam tv
मुंबई/पुणे

Mumbra Crime : दहशतवादी विरोधी पथकाची महाराष्ट्रातील मुंब्र्यात धाड; शिक्षकाला घेतलं ताब्यात

Mumbra Crime News : दहशतवादी विरोधी पथकाने महाराष्ट्रातील मुंब्र्यात धाड टाकली आहे. या प्रकरणी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

Vishal Gangurde

महाराष्ट्र एटीएसकडून मुंब्रा परिसरात मोठी कारवाई

एका संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून शिक्षक ताब्यात

पुण्यातील आरोपींच्या चौकशीत या शिक्षकाचं नाव पुढं

शिक्षकाच्या घरी सापडलेलं साहित्य एटीएसकडून जप्त

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे : दहशतवादी विरोधी पथकाने महाराष्ट्रात कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी एटीएसने सॉफ्टवेअर इंजिनीअरला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता ठाण्यातील मुंब्रा येथील एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. एका संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

दहशतवादी विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. या आरोपींची विचारपूस केल्यानंतर आरोपींनी मुंब्रामध्ये राहणारा एका शिक्षकाचा संबंध असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र एटीएसने आज मुंब्रा येथील कवसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली. दरम्यान, मुंब्रामध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा आणि आमचा कोणताही संबंध नाही नसल्याचे जमाती इस्लामिया संघटनेनं सांगितले. दोषी असल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले.

शिक्षकाच्या घरातील मोबाईल कॉम्पुटर आणि इतर सामग्री हस्तगत करून त्याला मुंबई येथील कुर्ला येथे त्याचा दुसऱ्या घरी महाराष्ट्र एटीआयच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे. शिक्षक हा जमाती इस्लामिया या संघटनेशी जोडलेले असल्यामुळे आरोपींनी या शिक्षकाचे नाव तपासामध्ये घेतला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, ताब्यात घेतलेला व्यक्ती काही ऑनलाइन ग्रुपमध्ये सक्रिय असल्याचे माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांनी त्याचे इमेल्स, मेसेजेस आणि बँक व्यवहार तपासण्यास सुरुवात केलीये. तत्पूर्वी, मुंब्रा, पुणे आणि मुंबई परिसरात पुढील काही दिवसांत आणखी काही ठिकाणी छापेमारी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; ५०० ठिकाणी छापे अन् ६०० जणांना ताब्यात घेतलं

Girja Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

SCROLL FOR NEXT