CM Eknath Shinde Vidhansabha Speech : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा आणि शेवटचा दिवस आहे. मागील पाच दिवस विरोधकांनी शिंदे सरकारला विकासकामांच्या मुद्द्यावरून अक्षरश: धारेवर धरलं. दरम्यान, सहाव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत भाषण करताना विरोधकांवर चांगलेच टोमणे मारले. 'अरे माझ्याकडे टॅलेंट आहे, पण तुम्ही मला काम करू दिले नाही. तुम्ही तिकडे जायचे आणि कानात बोलायचे, मला माझ्या टॅलेंटनुसार तुम्ही काम करू दिलं नाही. अशी टोलेबाजी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली. (Eknath Shinde Speech)
एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. आपल्या भाषणात त्यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं. 'अरे माझ्याकडे टॅलेंट आहे, पण तुम्ही मला काम करू दिले नाही. तुम्ही तिकडे जायचे आणि कानात बोलायचे, मला माझ्या टॅलेंटनुसार तुम्ही काम करू दिलं नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली नाही. शिवसेनेतून निवडून आलो आहोत. जनतेनं भाजप शिवसेना युतीला बहुमत दिलं होतं. बहुमत मिळाले तर कोणासोबत सरकार स्थापन करायचे होते, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेईमानी कोणी केली?, छगन भुजबळ आमचे लीडर होते त्यांना आमची भूमिका पटली असेल'. (Eknath Todays News)
'जर आम्ही बेईमानी केली असे म्हणता मग आम्ही गेलो की रस्त्यावर गर्दी कशी होते? लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. लोकांनी आमची भूमिका अमान्य केली असती. आज माझा उल्लेख केला कंत्राटी मुख्यमंत्री केला गेला, हो आहे मी कंत्राटी मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या विकासाचे मी कंत्राट घेतले आहे. जनतेचे अश्रु पुसण्याचे मी कंत्राट घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे मी कंत्राट घेतले आहे, असंघाशी संघ करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री बरा, असं एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. (Eknath Shinde Latest News)
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांनी दिलेल्या ऑफरचाही समाचार घेतला. 'जयंतराव मला काल तुम्ही मुख्यमंत्रिदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला. तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आलं नाही याचं दु:ख काल तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कालच्या जयंत पाटलांच्या भाषणाला तोडीस तोड उत्तर दिलं.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.