Maharashtra Assembly Monsoon Session Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Monsoon Session: ब्रेकिंग! मुंबईतल्या ७ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार? मुख्यमंत्री आज अधिवेशनात मांडणार ठराव

Mumbai Railway Stations Name Change Resolution In Monsoon Session: विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनांची नावं बदलण्याचा ठराव मांडणार आहेत. तसेच पावसामुळे झालेल्या गैरसोयीवरून देखील विरोधक आज आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Rohini Gudaghe

गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई

राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आजचा (८ जुलै)नववा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde Eknath) आज करी रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, सँडहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड आणि किंग्ज सर्कल या सात रेल्वे स्थानकांचे नावं बदलण्याचा ठराव विधानसभेत मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.

सात रेल्वे स्थानकांचे नावं बदलण्याचा ठराव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसापूर्वी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे त्याचबरोबर हर्बल रेल्वे स्थानकांच्या नावाबद्दल संदर्भात केलेल्या नवीन शिफारशी विधानसभेत ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवणार (Maharashtra Assembly Monsoon Session) आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानकाचे नाव लालबाग स्टेशन, तर सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्सचे मुंबादेवी तर चर्नी रोडचं गिरगाव रेल्वे स्थानक अशा पद्धतीचा आज ठराव सभागृहात पारित होऊ शकतो.

रेल्वे स्थानकांच्या नावासंदर्भात ठराव

या समवेत हार्बर स्थानकावरील सुद्धा काही रेल्वे स्थानकांच्या नावासंदर्भात आज सभागृहात ठराव पारित होऊ शकतो. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे काळाचौकी, डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव (Mumbai Railway Stations Name Change Resolution) तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असं होऊ शकतं. विधानसभेत हा ठराव करुन केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

विधानभवनात कोणते प्रश्न उपस्थित होणार?

राज्यात वाढत असलेल्या, तसेच काल झालेल्या झालेल्या वरळी येथील हिट अँड रन प्रकरणासंदर्भात सुद्धा आज विधानभवनात प्रश्न उपस्थित होणार आहेत. रात्रभर झालेल्या मुंबईतील पावसामुळे, मुंबईची तुंबई झाली. या संदर्भात सुद्धा विधानसभेत आज विरोधक सरकारवर आक्रमक होण्याची शक्यता (Maharashtra Politics) आहे.

मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावं बदलणार?

करी रोड -लालबाग स्टेशन

सँडहर्स्ट रोड- डोंगरी स्टेशन

मरीन लाईन्स-मुंबा देवी स्टेशन

चर्नी रोड - गिरगाव स्टेशन

कॉटन ग्रीन - काळाचौकी स्टेशन

डॉकयार्ड रोड- माझगाव स्टेशन

किंग्स सर्कल - तीर्थकर पार्श्वनाथ स्टेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT