Maharashtra Election Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; कुणाची माघार, तर कुणाची बंडखोरी कायम? वाचा

Maharashtra Election update : विधानसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. या विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांनी माघार घेतली आहे. तर काही बंडखोरांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

Saam Tv

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीचा माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. राज्यात बंडखोर उमेदवारांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढवली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आज सोमवारी अनेक बंडखोरी उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.

आज सोमवारी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्याची शेवटची वेळ होती. त्यामुळे काही विधानसभा मतदारसंघात बंडखोर राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवणार आहेत. तर काही बंडखोरांनी माघार घेतल्याने राजकीय पक्षांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीला दिलासा

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या हेमलता पाटील यांची अखेर माघार घेतली आहे. त्या नाशिक मध्य मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार होत्या

शिर्डीत महायुतीत बंडखोरी

शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी कायम असणार आहे. फडणवीस यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. भाजप बंडखोर डॉ.राजेंद्र पिपाडा यांचा उमेदवारी करण्याचा त्यांनी निर्णय जाहीर केला आहे.

पेण आणि पनवेलमध्ये ठाकरे गटाची बंडखोरी कायम

उद्धव ठाकरे यांनी आदेश देऊन देखील पेण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही. मात्र अलिबाग विधानसभेतून ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून सुरेंद्र म्हात्रे यांना माघार घेण्याच्या आदेश दिले. पेण आणि पनवेल विधानसभेतील उमेदवारांना देखील आदेश दिले असताना त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे पेण आणि पनवेलमध्ये ठाकरे गटाकडून बंडखोरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

वर्सोवा येथील शिवसेना ठाकरे गटातील बंडखोरी कायम

वर्सोवा येथील शिवसेना ठाकरे गटातील बंडखोरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून हारून खान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राजू पेडणेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला नाही. त्यामुळे महायुतीकडून भारती लव्हेकर, महाविकास आघाडी हारून खान आणि अपक्ष उमेदवार राजू पेडणेकर अशी लढत होईल.

कुर्ल्यातून मिलिंद कांबळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

कुर्ला विधानसभेतून शरद पवार गटाचे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कुर्ला विधानसभेतून ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात शरद पवार गटाकजून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. शरद पवारांच्या सूचनेनंतर मिलिंद अण्णा कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

आर्वी विधानसभा मनसे उमेदवाराने अर्ज घेतला मागे

वर्धा येथील आर्वी विधानसभेत मनसेचे विजय वाघमारे यांनी सुमित वानखेडे यांच्यासाठी अर्ज मागे घेतला. सुमित वानखेडे हे देवेंद्र फडणवीस यांचे पीए आहेत.

पाचपाखाडी कोपरी मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी

ठाण्यातील पाचपाखाडी कोपरी मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघात काँग्रेसने बंडखोरी केली आहे.

माहीममध्ये सदा सरवणकर निवडणूक लढवणार

माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांनी त्यांचा उमेवदारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे, ठाकरे गटाकडून महेश सावंत तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर मैदानात उतरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg : शिवकालीन सागरी सुरक्षेचे अभेद्य कवच, सिंधुदुर्गमध्ये लपलाय महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला

"मी नसतो तर तुरुंगात असता!" ट्रम्प यांनी फोनवर नेतान्याहूंना कडक शब्दात झापले; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ

Famous Actress : "तुझा ब्लाउज काढ..."; ऑडिशन सुरू असताना अभिनेत्रीकडे अश्लील मागणी, भयंकर घटना वाचून धक्काच बसेल

Weather Update : पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रात वादळी पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Ladki Bahin Yojana Update: 'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT