Maharashtra Election  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : PM नरेंद्र मोदींच्या ८, गडकरी ४०, योगींच्या १५ सभा; महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची कशी असेल रणनीती?

Maharashtra Election Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुतीसाठी राज्यात पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात एकूण ८ रॅली होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पंतप्रधान मोदींच्या सभा होणार आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही सभा होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात एकूण १५ जाहीर सभा होणार आहेत.

महाराष्ट्रात कोणाच्या किती सभा?

पंतप्रधान मोदी - ८

अमित शहा - २०

नितीन गडकरी - ४०

देवेंद्र फडणवीस - ५०

योगी आदित्यनाथ - १५

महाराष्ट्राच्या २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना , शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यातील विरोधी पक्षातील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदनात उतरले आहेत.

२० नोव्हेंबरला होणार मतदान

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएची साथ सोडली.

शिवसेनेने पुढे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. जून २०२२ साली शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे हे पक्षातील ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या समर्थनात मुख्यमंत्री झाले. आता शिवसेना दोन गटात विभागली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांना घेऊन बाहेर पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT