Sachin Folane joined Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics News : ऐन निवडणुकीत पुण्यात भाजपला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने शरद पवार गटात केला प्रवेश

Maharashtra Assembly Election : पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षातील बड्या नेत्याने शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Satish Kengar

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांनी पक्षाची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. सचिन फौलाने हे भाजप खासदार खासदार मेधा कुलकर्णी यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

कोण आहेत सचिन फोलाने?

मिळाली माहितीनुसार, सचिन फोलाने हे भाजप पक्षाच्या विविध महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. त्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

सचिन फोलाने यांनी भाजपात अनेक वर्षे महत्त्वाच्या पदांवर कार्य केले असून, भाजप पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवून काम केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकहितैषी धोरणांशी प्रेरित होत आणि शरद पवारच्या विचारधारेशी एकरूप होत, त्यांनी हा प्रवेश केलं असल्याचं सांगितलं आहे.

Rajendra Kumar Gavit : राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाला सोडचिठ्ठी

दरम्यान, नंदुरबारमध्येही भाजपला फटका बसला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित भाजप पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांनी आपल्या पदाचाही राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते शहादा-तळोदा मतदारसंघातून लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

राजेंद्रकुमार गावित हे भाजपचे अत्यंत महत्त्वाचे नेते होते. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून ते इकचुक होते. मात्र येथे आधीच राजेश पाडवी आमदार असून पुन्हा एकदा त्यांचं तिकीट मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. म्हणूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवणी तर भाजप उमेदवाराला याचा फटका बसू शकतो, असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT