लतादीदींच्या प्रकृतीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने केली दगडूशेठ गणपतीची महाआरती
लतादीदींच्या प्रकृतीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने केली दगडूशेठ गणपतीची महाआरती 
मुंबई/पुणे

लतादीदींच्या प्रकृतीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने केली दगडूशेठ गणपतीची महाआरती

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

पुणे : स्वर सम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर या कोरोना मुळे रुग्णालयात दाखल आहेत.त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गो-हे,शिवसेना महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेना (Shivsena) पुणे शहराच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली.

या प्रसंगी डॉ.गो-हे यांनी भारतरत्न लताताई मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे स्थान सर्व भारतीयांच्या आणि सर्वांच्या हृदयात असून त्यांची श्रद्धा,आणि माणुसकी,त्यांची कामावरची निष्ठा तसेच हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलचा त्यांचा अकृत्रिम स्नेह लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नीलम गोऱ्हेनी सांगितले.

तसेच या कार्यक्रमाची कल्पना मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) व रश्मिताई ठाकरे यांना असल्याचे संगितले. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे,निर्मला केंडे,स्वाती ढमाले,अमृता पठारे,सुदर्शना त्रिगुणाईत,सुलभा तळेकर,अश्विनी शिंदे,विद्या होडे,राहुल जेकटे,अनीता परदेशी,वैशाली दारवटकर,अरुणा पवार,स्मृति नाझरकर,मकरंद पेठकर,स्वाती कथलकर शिवा जगधणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगा ठार, जुन्नर तालुक्यातील घटना

Bhandara News: धावत्या बसमध्ये प्रवाशानं सोडला जीव; भोवळ आल्यावरच बस हॉस्पिटलला नेण्याची केली विनंती, पण कंडक्टर अडून बसला

Maharashtra Politics : काँग्रेस मजबूत, तर देश मजबूत होईल; शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Nashik Crime News : गुन्हेगार मित्रांची संगत नडली, नाशिकमध्ये ६ जणांसह ८७ गुंड तडीपार

Hingoli Water Crisis : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर; हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा

SCROLL FOR NEXT