Maha Vikas Aghadi Meeting Saam Tv
मुंबई/पुणे

Maha Vikas Aghadi Meeting: भाजपविरुद्ध पुन्हा 'वज्रमूठ', मविआच्या आजच्या बैठकीत काय ठरलं? जाणून घ्या....

Maha Vikas Aghadi Meeting News: भाजपविरुद्ध पुन्हा 'वज्रमूठ', मविआच्या आजच्या बैठकीत काय ठरलं? जाणून घ्या....

साम टिव्ही ब्युरो

Maha Vikas Aghadi Meeting: आज महाविकास आघाडीतल्या सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेते उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, ''आम्ही तिन्ही मित्र पक्ष एकत्र आहोत. एकत्र लढणार आहोत. लोक आमच्याबरोबर आहेत. आम्ही विभागवार बैठका घेणार आहोत. तसेल लवकरच वज्रमुठ सभा देखील सुरू होतील.''

या बैठकीबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ''आमच्या तिन्ही पक्षाचे नेते दौरे करणार आहे. मविआ एकत्रित येत दौरे करणार आहे. वज्रमुठ सभा पुन्हा होतील.''  (Latest Marathi News)

दानवे म्हणाले की, 'सोबतच होऊन जाऊ दे चर्चा' हा कार्यक्रम देखील आम्ही घेणार. लोकांच्या पदरी निराशाच पडली आहे. पक्षाची फोडाफोडी जे करतात त्यांच्यावर जनतेचा रोष आहे.

काँग्रेस आमदार नसीम खान म्हणाले आहेत की, ''आज महाविकास आघाडीची बैठक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पार पडली. सरकारनं ज्याप्रमाणे शेतकरी, नागरिक, विकासांच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांकडे दुर्लक्ष करत आहे. भेदभाव करत आहे, निधी देत नाही. येणाऱ्या ४-५ महिन्यात भाजपनं लोकशाहीची हत्या केली आहे. याप्रकरणी मविआचे नेते जिल्हानिहाय दौरे करतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Dapoli : इतिहासप्रेमींसाठी खास; दापोलीला गेल्यावर पाहायला विसरू नका 'हा' किल्ला, मिळतो समुद्रदृश्यांचा अद्भुत अनुभव

स्वामी समर्थांच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला! शिर्डीहून अक्कलकोटला जात असताना भीषण अपघातात 5 महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू

Maharashtra News Live Update : मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक गोष्टी केल्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summer Waterfall In Mumbai:भर उन्हाळ्यात मुंबईत वाहतोय पांढराशुभ्र धबधबा! पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा कुठे आहे हे ठिकाण?

Chanakya Niti: समोर मित्र, पण पाठीमागे शत्रू? या ५ चिन्हांवरून ओळखा लोकांचा खरा चेहरा

SCROLL FOR NEXT