Madhya Pradesh News  Saam Tv
मुंबई/पुणे

Madhya Pradesh : मध्य प्रदेश हादरलं! ७ जणांनी बायकोची छेड काढून केली मारहाण, नवऱ्याने २ मुलांसह जीवन संपवलं

Madhya Pradesh Latest News : मध्य प्रदेशमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पित्याने दोन मुलांसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या तिघांचे मृतदेह आंब्याच्या झाडावर लटकलेले आढळले.

Vishal Gangurde

Madhya Pradesh Latest news :

मध्य प्रदेशमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पित्याने दोन मुलांसह गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या तिघांचे मृतदेह आंब्याच्या झाडावर लटकलेले आढळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या शामगड ठाणे क्षेत्राच्या रुंडी गावात ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने मुलगा आणि मुलीसोबत जीवन संपवलं आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी देखील लिहिलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं?

आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत म्हटलं आहे की, 'तीन महिन्यांपूर्वी पत्नी नैनी हिची गावातील राजू, कालू, सोनू, गीताबाई, नोजीबाई, लीलाबाई, गोविंद यांनी मारहाण करून छेड काढली. तसेच त्यांनी या सर्वांना स्वत :च्या आणि मुलांच्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे. तसेच या चिठ्ठीत पोलिसांकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

मृत व्यक्तीचा आरोप होता की, पत्नीला गावातील एकाच कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी मारहाण केली आणि छेड काढली. नैनी हिचा पती रविवारी सांयकाळी तीन महिन्यानंतर घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर मुलांनी शामगडमधून शॉपिंग केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी या तिन्ही जणांचा मृतदेह गावातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

पोलिसांकडून तपास सुरु

तिघांनी आत्महत्या केल्यानंतर मृत व्यक्तीची पत्नी आणि त्यांचे नातेवाईक पोलिसांत धाव घेऊन कारवाईची मागणी केली. मृतकांच्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरी पोहोचून त्याच्या घराची तोडफोड केली आहे. मृतकांच्या नातेवाईकांनी पोलिसांशी देखील हुज्जत घातली.

या घटनेनंतर पोलिसांनी मृतांच्या आरोपींना शांत करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असल्याचे समोर आलं आहे. या घटनेने परिसरात गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या फरार आरोपींचा तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT