crime News
crime News Saam Tv
मुंबई/पुणे

दौंडमध्ये किळसवाणा प्रकार! 20 रुपयांचं आमिष अन् 11 वर्षाच्या मुलीवर...

मंगेश कचरे, साम टीव्ही, जुजेरी

मंगेश कचरे

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात अल्पवयीन मुलींसह महिलांवर झाल्याचा घटना सातत्याने समोर येत आहेत. महाराष्ट्रातील दररोज अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात पुणे (Pune) जिल्ह्याला हादरवणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला वीस रुपये देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. नराधम आरोपी मागील एक वर्षापासून पीडित मुलीवर अत्त्याचार करत होता अशी माहिती आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आई वडिलांना मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या आई वडिलांनी पाटस पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. मयुर पांडुरंग फडके असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. तर असून तो दौंड तालुक्यातील कानगाव येथील रहिवासी आहे.

याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर फडके हा मागील एक वर्षांपासून गावातील ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा. पीडित मुलीच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो पीडितेला वीस रुपये देण्याचे आमिष दाखवत असे. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexuall Assault) करायचा. मागील एक वर्षांपासून नराधम आरोपी पीडितेला नरक यातना देत होता.

हे देखील पहा-

गुन्हा दाखल होताच यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलिसांनी नराधम आरोपीला तात्काळ अटक केली. नराधम आरोपी मागील १ वर्षांपासून अशाप्रकारे पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याची घटना कळताच गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT