Mumbai Crime News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मर्चट नेव्हीत नोकरीचं आमिष, बेरोजगार तरुणांना 43 लाखांना गंडवले

Crime News: साकीनाका पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून १२७ हून अधिक पासपोर्ट जमा करण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Mumbai Crime News : सध्या मुंबईसह देशभरात बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या वाढलेली आहे. यामुळे अनेक तरुण-तरुणी नोकरी मिळवण्यासाठी पैसे देण्यासाठी देखील तयार असतात. याच परिस्थितीचा फायदा घेऊन काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांची फसवणूक केली जात आहे.

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अशाच एका गुन्ह्यातील टोळीला अटक केली आहे. मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली या सराईत गुन्हेगारांनी शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. साकीनाका पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून १२७ हून अधिक पासपोर्ट जमा करण्यात आले आहेत.

शिवकुमार राजेशकुमार गुप्ता वय २९ वर्षे, उदीत कमल सिंग वय २४ वर्षे आणि सिद्धार्थ कमल बाजपेयी वय २२ वर्षे अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. साकीनाका पोलिसांना या तीनही आरोपींना नोएडा येथून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींनी मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात मर्चन्ट नेव्हीत नोकरी मिळवून देण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये अग्याता मरिन्स अलाईस शिपमेन्ट नावाने कार्यालये उघडले. यासंबंधीची जाहिरात देखील त्यांनी वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. यानंतर अनेक उच्चशिक्षित तरुणांनी या कार्यालयात नोकरीसाठी अर्ज केले. (Latest Marathi News)

आरोपींनी या सर्व इच्छुक उमेदवारांकडून नोकरी मिळवून देण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली होती, तसेच अनेक तरुणांचे पासपोर्ट देखील जमा करून घेतले होते. मात्र कालांतराने हे कार्यालय बंद करून तेथील कर्मचारी प्रसार झाले. यानंतर तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकीनाका पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणी तक्रार दाखल केली.

साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी कलम ४२० आणि ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात सुरुवात केली. पोलिसांनी फरार आरोपींचे लोकेशन तपासले तेव्हा ते दिल्ली नोएडा परिसरात असल्याचे समजले. यानंतर साकीनाका पोलिसांनी यात तीन फरार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. (Mumbai Crime)

सध्या हे तीनही आरोपी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या इतरही साथीदारांचा आता पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी या सर्वांची खाती फ्रीज केली असून तीन्ही आरोपींकडून 127 बेरोजगार तरुणांचे पासपोर्ट आणि सीडीसी ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Candidate List : भाजपच्या १४८ उमेदवाराची यादी एका क्लिकवर, कुणाला कुठून मिळाली संधी?

Viral Video: भयंकर! उत्सवात फटाक्यांचा स्फोट, १५० जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर; थरारक घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Maharashtra News Live Updates : भाजपची चौथी यादी जाहीर

Samruddhi Kelkar: दिवाळीत समृद्धीनं केलं खास फोटोशूट; हिरव्या पैठणी साडीत दिसतेय सुंदर

Railway Job: १२वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; पगार २२०००; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT