आघाडीमुळे काँग्रेसला फटका; नाना पटोलेंनी व्यक्त केली खंत Saam Tv News
मुंबई/पुणे

आघाडीमुळे काँग्रेसला फटका; नाना पटोलेंनी व्यक्त केली खंत!

'देश आणि संविधान वाचवायचा असेल तर काँग्रेस वाचली पाहिजे'

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर : आघाडीमुळेच पालघरमध्ये काँग्रेसला Congress फटका बसला असून काँग्रेस पालघर मध्ये आपल्या मित्र पक्षांना जागा सोडत असल्याने काँग्रेसच नुकसान झाल्याची खंत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी आज व्यक्त केली. आज ते पालघर जिल्हा परिषद आणि त्यामधील पंचायत समित्यांच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पालघर मध्ये आले असता बोलत होते. (Loss of Congress due to lead)

हे देखील पहा -

यासाठी काँग्रेस वाचली पाहिजे

देश आणि संविधान Constitution वाचवायचा असेल तर काँग्रेस वाचली पाहिजे असं आवाहन नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आहे. तसेच पालघर जिल्हा परिषद आणि त्यामधील पंचायत समित्यांच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ विधानसभा आणि लोकसभेला काँग्रेसने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस NCP सोबत आघाडी करत असल्याने पालघर मधून काँग्रेसची पीछेहाट झाल्याच यावेळी नाना पटोले म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसने पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याच पटोलेंनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन सध्याचे पालघरचे खासदार आपली दुकानदारी चालवत असल्याचा घणाघात आरोप नाना पटोले यांनी शिवसेना Shivsen खासदार राजेंद्र गावित MP Rajendra Gavit यांच्यावर केला आहे. पालघर जिल्हा निर्मिती ची संकल्पना ही काँग्रेसची असून त्याचे श्रेय मात्र गावित घेत असल्याचा आरोप यावेळी केला आहे.

Edited By - jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Travel Tips: दिवाळीत ट्रेनमधून प्रवास करताय? या वस्तू चुकूनही घेऊन जाऊ नका

Gujarat News : गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड; 10-11 मंत्र्यांचा राजीनामा, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला मिळणार महत्वाची जबाबदारी

Maharashtra Live News Update: अलिबाग येथील RCF कंपनी विरोधातील शिवसेनेने सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

Nashik Crime: गुन्हेगारी रॅपरची जिरवली; टक्कल करत काढली धिंड, कोयत्याची भाषा करणाऱ्याला चालताही येईना

Farmer Rasta Roko : चोपडा तालुका मदतीपासून वगळला; बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको

SCROLL FOR NEXT