परमबीर सिंग - Saam Tv
मुंबई/पुणे

परमबीर सिंग यांच्या विरोधात चक्क लूक आउट नोटिस?

सूरज सावंत

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर लेटर बाँम्ब Letter Bomb टाकत माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांनी राज्याच्या राजकारणात Politics मोठी खळबळ उडवून दिली. परमबीर सिंग याच्या लेटरनंतर देशमुखाना गृहमंत्री Home Ministry पदाचा राजीनामा द्यावा लागलाच, मात्र सरकारही अडचणीत आलं. कालांतराने या प्रकरणात ईडीने उडी टाकत देशमुखांभोवती फास आवळला. राज्यात 'ईडी' ED अॅक्शन मोडमध्ये असताना. मोठ्या सुट्टीवर गेलेले परमबीर सिंग मात्र अद्याप हजर न झाल्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. Look out notice against Parambir Singh

उद्योगपती मुकेश अंबानींच्या Mukesh Ambani घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचं प्रकरण व्यवस्थित न हाताळल्याचा आरोप करत देशमुखांनी परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचल बांगडी केली. त्यालाच प्रतिउत्तर देत परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसूली प्रकरणाचा 'लेटर बाँम्ब' टाकत देशमुखाची खुर्ची घालवली. या 'लेटर बाँम्ब'ने राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली. यावरून विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला नाकीनऊ आणलं. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक एक कागद सादर करत, सरकारला संकटात टाकलं.

परमबीर सिंग यांनी मार्च महिन्याच्या मध्यात लेटर बाँम्ब टाकला होता. त्यानंतर परमबीर हे त्यांची नियुक्ती केलेल्या गृहरक्षक दलाचेसंचालक म्हणून काही दिवस हजर झाले आणि ५ मे रोजी सुट्टीवरही गेले. ते आज तागायत हजर झाले नाहीत. परमबीर सिंग याच्या लेटर बाँम्बनंतर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडल्या, मात्र परमबीर यांनी तोपर्यत महाराष्ट्र सोडला होता. परमबीर हे सध्या चंडीगढ येथे असल्याचे बोलले जाते. मात्र, सध्या चंडीगढ येथील त्यांच्या घरालाही कुलूप असल्याचे सूत्रांनी सांगितले. Look out notice against Parambir Singh

हे प्रकरण न्याय प्रविष्ठेत असताना परमबीर सिंग आहेत कुठे असे विचारले असता. परमबीर सिंग यांच्या वकिलांनी ते चंदीगडमध्ये असल्याचे न्यायालयात सांगितले. तर आजारी असल्याचे सांगत परमबीर यांनी औषध उपचाराची कागदपत्रेही पाठवली आहेत. दरम्यान मोहरम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड याची नियुक्ती महत्वाची असते. मात्र परमबीर सिंग नसल्यामुळे त्या विभागाचा चार्ज हा के. व्यंकटेशम यांच्यावर सोपवला होता.

तीन ते चार महिने परमबीर सिंह हे सुट्टीवरअसल्याने गृहविभागाकडून परमबीर सिंग यांना दोन वेळा पत्र पाठवून विचारणा केली. मात्र, परमबीर यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेलं नाही. परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. चंदीगडच्या घरालाही ताळे असल्याने परमबिर सिंह गेले कुठे याचीच चर्चा रंगली आहे.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT