वाझेचा '१ नंबर बाॅस' परमबीरसिंगच.....

मुंबईचा माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेचा 'एक नंबर बाॅस' परमबीरसिंगच असल्याचं समोर आलं आहे
परमबीरसिंग - सचिन वाझे
परमबीरसिंग - सचिन वाझे- Saam Tv
Published On

मुंबई : मुंबईचा Mumbai माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेचा Sachin Waze 'एक नंबर बाॅस' परमबीरसिंगच Parambir Singh असल्याचं समोर आलं आहे. परमबीरसिंग यांच्या विरोधात गोरेगाव Goregaon येथे दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. तक्रारदाराच्या जबाबात भाजप BJP नेते आमदार प्रसाद लाड यांचाही उल्लेख आहे. New revelation about Parambir Singh and Sachin Waze

परमबीरसिंग यांच्यावर गोरेगाव पोलीस Police ठाण्यात आणखी एक वसूली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंग यांच्यासोबत सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांची नावे देखील या गुन्ह्यात समोर आली आहेत. हा गुन्हा बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने नोंदवला आहे

परमबीरसिंग यांची पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर हाॅटेल कलेक्शन, बार कलेक्शन सुरु झाले. तसेच बुकींना खुलेपणाने धंदा करण्याचीही वाझेने हमी दिली होती. हप्ता दिल्यास दुबीला जाऊन बुकीचा व्यवसाय करण्याची गरज नाही, असे वाझेने त्यांना सांगितले होते. कोरोनाच्या काळात नुकसान झाल्याने या सर्वांना मिळून दिवसाचे दोन कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते, असेही तक्रारीतून उघड झाले आहे.

परमबीरसिंग - सचिन वाझे
नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल

या वसुलीतले ७५ टक्के पैसे 'एक नंबर'ला तर २५ टक्के पैसे इतरांनी वाटून घ्यायचे असे ठरले होते. हा 'एक नंबर' दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द परमबीरसिंगच असल्याचे तक्रारदाराच्या जबाबातून उघड झाले आहे. केवळ हाॅटेल, बार मालक किंवा बुकीच नव्हे तर कोरोनात झालेले 'नुकसान' भरुन काढण्यासाठी वाझेने मुंबई पालिकेतल्या कंत्राटदारांनाही लक्ष्य केले होते. दरम्यान, या संदर्भात तक्रार देणाऱ्याने आपल्यासह कुटुंबाला पोलिस संरक्षण मागितले आहे. वाझे, परमबीरसिंग व त्यांचे इतर सहकारी आपला मनसुख हिरेन करतील, अशी भिती या तक्रारदाराने व्यक्त केली आहे. New revelation about Parambir Singh and Sachin Waze

दरम्यान, बडतर्फीनंतर पुन्हा राज्याच्या पोलिस सेवेत दाखल होण्यापूर्वीच सचिन वाझेने व्यापारी व बुकींसोबत मिटिंग केली होती असे तपासात दिसून आले आहे. वाझेने पोलिस दलात येण्यापूर्वीच व्यापारी, बार मालक व बुकींसोबत बोलणी सुरु केली होती. परमबीरसिंग मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावर नियुक्त झाल्यानंतर वाझेला मुंबई क्राईम ब्रँचच्या 'सीआययू'चे प्रमुखपद मिळणार हे भाकित त्यावेळी पोलिस वर्तुळात केले जात होते. ते नंतर खरे ठरले.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com