Traffic Jam On Mumbai-Pune High Way Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Highway: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Lonavala Traffic Jam: लोणावळ्यामध्ये मोठ्यासंख्येने पर्यटक आले आहेत. अशामध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांसोबत प्रवासी देखील त्रस्त झाले आहेत.

Priya More

दिलीप कांबळे, मावळ

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (Old Mumbai Pune Highway) मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह प्रवासी देखील त्रस्त झाले आहेत. विकेंडमुळे वाहन चालक आपल्या खासगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात आहे. लोणावळा ग्रामीण वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून लोणावळ्यात एकेरी वाहतूक सुरू आहे. कारण पावसाळा सुरू झाल्याने आता महाराष्ट्रभरातून अनेक पर्यटक हे लोणावळ्यात पर्यटनासाठी येतात. त्यामुळे लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. स्थानिकांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना देखील अर्धा वेळ वाहतूक कोंडीत काढावा लागतो.

यावर्षी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी लोणावळा पोलिसांनी आता लोणावळ्यातील वाहतूक एकेरी केली आहे. संपूर्ण लोणावळा शहरात नगरपरिषदेच्या वतीने प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. एकेरी वाहतूक केल्याने आता पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही आणि पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे विकेंड असल्यामुळे लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी मोठ्यासंख्येने येणारे पर्यटक. आता सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून पर्यटक परत जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहिशी मंदावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय

Khalid Ka Shivaji: 'खालिद का शिवाजी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठा धक्का; महाराष्ट्र सरकारने केली कारवाई

Raksha Bandhan 2025 : 'हम साथ साथ हैं' ते 'जिगरा'; लाडक्या बहिणीसाठी प्लान करा मूव्ही डेट

Swollen veins in hands: हाताच्या नसा फुगलेल्या दिसत असतील तर सावध व्हा; 'या' 6 आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता

ओला - उबर सोडा, आता सरकारी टॅक्सीतून फिरा, कमी दरात उत्तम सेवा; पहा कुठे अन् कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT