Lonavla Crime  Saamtv
मुंबई/पुणे

Lonavla Crime News: लोणावळा दुहेरी हत्याकांड! तब्बल ३० वर्षांनी आरोपी अटकेत; काय आहे प्रकरण?

Crime News Update: हा आरोपी विक्रोळी परिसरात टुरिस्ट गाडी चालवण्याचे काम करत होता.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Lonavala Crime: लोणावळा येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी 30 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने अटक केली आहे. आरोपी आपले नाव आणि ओळख लपवून मागील अनेक वर्षापासून मुंबईच्या विक्रोळी परिसरात राहत होता. अविनाश भिमराव पवार (49 वर्षे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो विक्रोळी परिसरात टुरिस्ट गाडी चालवण्याचे काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा (Lonavla) येथील यशोधा बंगला, सत्यम सोसायटी, याठिकाणी वयोवृध्द असलेले दाम्पत्य धनराज ठाकर्सी कुरवा, (वय ५५ वर्षे) व त्यांची पत्नी धनलक्ष्मी धनराज कुवा (वय ५० वर्षे) यांचा त्यांच्या घरात घुसून दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व धारधार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. (Latest Marathi News)

या प्रकरणात लोणावळा शहर पोलीस पोलीसांनी अमोल जॉन काळे उर्फ टिल्लु व विजय अरुण देसाई या दोघांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी अविनाश भिमराव पवार (१९ वर्षे) फरार झाला होता. लोणावळा पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु आरोपी सापडला नव्हता.

अलिकडेच या आरोपी संदर्भात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखा 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली. ज्यानुसार आरोपी स्वत:चे मुळ नाव व ओळख बदलून मुंबईत वावरत असल्याचे समजले होते. याच माहितीवरून पथक नेमून आरोपीवर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीची एकंदरीत वागणुक संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेवून तपास केला असता आपले नाव अविनाश भिमराव पवार असे सांगुन तोच लोणावळा पोलीस ठाणे गु.र. क्र.८०/१९९३ कलम ३०२, ३४ भादवि मधील फरार आरोपी असल्याचे व तो सध्या नाव बदलुन अमित भिमराज पवार या नावाने विक्रोळी पूर्व, मुंबई ८३ याठिकाणी राहत असल्याची कबुली दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT