lonavala city police collects fine 3 lakh 61 thousand in two days saam tv
मुंबई/पुणे

Lonavala : लाेणावळ्यात पाेलिसांची आजही करडी नजर, तीन लाख 61 हजारांचा दंड वसूल

New Year 2024 : दुचाकीसह चार चाकी वाहनधारक पर्यटकांवर देखील दंडात्मक कारवाई झाली.

दिलीप कांबळे

Lonavala News :

लोणावळा शहरात थर्टी फस्ट (31st december) व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 362 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी (lonavala city police) कारवाई केली आहे. आजही (साेमवार) लाेणावळा पाेलिस ठिकठिकाणी वाहन आणि वाहन चालकांची तपासणी करीत आहेत. (Maharashtra News)

लोणावळा शहर वाहतूक शाखेकडून दाेन दिवसांत तब्बल तीन लाख 61 हजार 300 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पाेलिसांकडून आजही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळाली. यामध्ये दुचाकीसह चार चाकी वाहनधारक पर्यटकांचा देखील समावेश आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वाहतुकीस अडथळा, लायन्स जवळ न बाळगणे, नो एंट्री, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत विरुद्ध दिशेने वाहन चालवणे यासह दारू पिऊन वाहन चालविणे (drink and drive cases) अशा विविध नियमांचे पालन केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT