Bhushi Dam Incident  Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: लग्नाची पार्टी करायला आलो होतो, डोळ्यासमोरच ५ जण वाहून गेले; नातेवाईकाने सांगितला भूशी डॅम परिसरातील थरार

What Happened With Ansari Family: पुण्यातील अन्सारी कुटुंबीय लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी आले असता ही घटना घडली होती. भुशी डॅम परिसरात या अन्सारी कुटुंबीयांसोबत नेमकं काय घडलं. वाचा सविस्तर...

Priya More

लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरातील धबधब्यावर एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची घटना घडली होती. यामधील ३ जणांचे मृतदेह रविवारी रात्री उशिरापर्यंत सापडले होते. आज सकाळी आणखी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. आज रेस्क्यू टीमला आणखी एकाचा मृतदेह सापडला. एकूण ४ जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. तर आणखी एकाचा शोध घेतला जात आहे. पुण्यातील अन्सारी कुटुंबीय (Ansari Family) लोणावळ्यामध्ये (Lonavala) फिरण्यासाठी आले असता ही घटना घडली होती. भुशी डॅम परिसरात या अन्सारी कुटुंबीयांसोबत नेमकं काय घडलं याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी थरार सांगितला आहे.

भुशी डॅम परिसरात वाहून गेलेल्या अन्सारी कुटुंबीयांचे नातेवाईक सोयल सय्यद यांनी सांगितले की, 'ते सर्वजण इथे फिरण्यासाठी आले होते. खाली एक छोटा धबधबा होता. पण त्याठिकाणी त्यांना पार्किंगसाठी जागा मिळाली नाही. ते सर्वजण पुण्यावरून १७ सीटर टेम्पो ट्रॅव्हलरने आले होते. खाली पार्किंगला जागा मिळाली नाही त्यामुळे ते भुशी डॅमपर्यंत आले. खाली एक बोर्ड लावला होता. उजव्या बाजूला भुशी डॅम आहे आणि डाव्या बाजूला नो एन्ट्री होती. पण कोही लोकं याठिकाणी येत होती त्यामुळे ते देखील त्यांच्या मागे मागे इथपर्यंत आले.'

तसंच, 'भुशी डॅम परिसरातील धबधब्यावर ते गेले. त्यावेळी पाऊस नव्हता आणि धबधब्यावर पाणी देखील कमी होते. त्यामुळे ते पुढे पुढे गेले. पण अचानक पाऊस वाढला आणि पाण्याचा वेग वाढला. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे ते तिथे अडकले. सर्वांनी एकमेकांना पकडले होते. त्यांनी जीव वाचण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण एका मुलीचा पाय घसरला आणि सगळेच वाहून गेले. ते सर्वजण लग्नानंतर पार्टी करण्यासाठी आणि फिरण्यासाठी लोणावळ्यात आले होते.'

दरम्यान, पुण्यावरून आलेले अन्सारी कुटुंबीय लोणावळ्यात फिरण्यासाठी आले होते. ते भुशी डॅम परिसरातील रेल्वे वॉटरफॉलवर गेले होते. ८ जण धबधब्यात उतरले होते. त्यावेळी पाणी कमी होते. पण अचानक त्याठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पाण्याचा वेग वाढला. त्यामधील ५ जण वाहून गेले. यामध्ये एक महिला आणि ४ मुलांचा समावेश होता. यामधील ४ जणांचे मृतदेह सापडले. एकाचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

SCROLL FOR NEXT