पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटींचे साऊंड चोरीला ? pmc.gov.in
मुंबई/पुणे

पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटींचे साऊंड चोरीला ?

या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉस कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत.

अश्‍विनी जाधव केदारी

पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड चोरीला गेले असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी सर्व साधारण सभेत समोर आणली आहे. त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम (बॉस कंपनीचे) बसवण्यात आली होती. कोरोना काळात दीड वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉस कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत.

एवढेच नव्हे तर त्याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आले आहेत. प्रशासनाने याप्रकरणी काय कारवाई केली? याप्रकरणी प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला नाही असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे, या प्रकरणी वास्तव काय आहे हे आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं उत्तर सत्ताधारी देता आहेत. नेमका हा सगळा प्रकार कोणाच्या संगनमताने होतोय हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patole: कुणी कुणाला धमकावला तर घरात घुसून मारू, नाना पटोले यांचा रोख कुणाकडं?

Sachin Sanghvi : प्रसिद्ध गायक सचिन सांघवीविरुद्ध गुन्हा दाखल; अत्याचार अन् गर्भपाताचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Railway Recruitment: १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Maharashtra politics : ठाकरेंसह भाजपलाही धक्का, अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भंडाऱ्याचे राजकारण फिरणार

SCROLL FOR NEXT