BJP  saam tv
मुंबई/पुणे

Loksabha Election 2024 : मुंबईत भाजपकडून तिकीट वाटपात धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता, बड्या नेत्यांचं तिकीट कापलं जाणार?

BJP Mumbai Political News : भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज मसूरकर | मुंबई

Mumbai News :

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांना डावलत त्याचा पत्ता कट केला जाऊ शकतो. मतदारसंघातील कल पाहून निर्णय घेत जिंकू शकणाऱ्या नेत्यांना भाजपकडून लोकसभेसाठी पुढे केले जाऊ शकते.

भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील पूनम महाजन आणि ईशान्य मुंबई मतदारसंघातील मनोज कोटक यांच्याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूनम महाजन यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने आशिष शेलार यांना या जागेसाठी भाजपकडून विचारणा करण्यात आल्याचं बोललं जात आहे.मात्र आपण लढण्यास इच्छुक नसून, पूनम महाजन यांना निवडून आणू असा विश्वास आशिष शेलार यांनी केंद्रीय नेतृत्वाला दिल्याची माहिती साम टीव्हीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

तर मनोज कोटक यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शहा यांचा नावाचा विचार सुरू आहे. मनोज कोटक यांना पुन्हा तिकीट द्यायचं की त्यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शहा यांच्या पैकी एकाला संधी द्यायची यावर देखील भाजप नेतृत्वाचा विचार सुरू आहे. येत्या 48 तासांत मुंबईतल्या या दोन जागाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ, विदर्भाला यलो अलर्ट, वाचा पावसाचा अंदाज

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

SCROLL FOR NEXT