Pune Politics : वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर? काय असेल रणनिती? वाचा सविस्तर

Vasant More Pune Political News: वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Vasant More- Sharad pawar
Vasant More- Sharad pawarSaam Tv
Published On

Vasant More News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील चेहरा वसंत मोरे यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पुण्यातील मनसेमधील अतंर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. आपल्याला डावलंल जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपली पुढील राजकीय भूमिका काय असेल, याबाबत २-३ दिवसात कळवणार असल्याचं देखील वसंत मोरे यांनी सांगितलं.

मात्र वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार की अपक्ष निवडणूक लढवणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे वसंत मोरे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vasant More- Sharad pawar
Vasant More PC : अश्रू... आरोप... खदखद... संताप... वसंत मोरे यांची काळाजाला भिडणारी १० वाक्ये

वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र वसंत मोरे शरद पवार गटात का जातील यावर एक नजर टाकूया. (Latest Marathi News)

बारामती मतदारसंघासाठी शरद पवार यांनी नेत्यांच्या जुळजुळवीची तयारी सुरु केली आहे. त्याच रणनितीचा भाग म्हणून वसंत मोरे यांचा शरद पवार गटाला फायदा होऊ शकतो. खडकवासला, पुणे शहराचा काही भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांच्यावर खडकवासलामध्ये मोर्चे बांधणीची जबाबदारी होती.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना वसंत मोरे यांची मोठी मदत मिळू शकते. कारण मागील दोन निवडणुकांमधे खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना हवं तसं मतदान झालं नव्हतं. तिथे वसंत मोरे यांचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो.

Vasant More- Sharad pawar
Vasant More Cried: ठाकरेंची साथ सोडताना वसंत तात्यांच्या डोळ्यात अश्रू, पत्रकार परिषदेत ढसढसा रडले; राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याचा शब्द शब्द शरद पवार गटाकडून दिला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील वसंत मोरे यांचे स्वागत करु असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे आणि शरद पवार यांच्या भेटीची राजकीय वर्तळात जोरदार चर्चा होती. त्यामुळे ही भेट आणि वसंत मोरे यांचा राजकीय निर्णय यांचा काही संबंध होता का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com