Mahayuti  Saam TV
मुंबई/पुणे

Loksabha Election 2024 : महायुतीत रस्सीखेच; मावळ लोकसभेवर भाजप, शिंदे गटापाठोपाठ अजित पवार गटाचाही दावा

Political News : भाजप आणि शिंदे गट मावळच्या जागेवर दावा करत असताना राष्ट्रवादीचा अजित पवार गट देखील मागे नाही. मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न करू, असं सुनील शेळके यांनी म्हटलं.

दिलीप कांबळे

Pune Political News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान मावळ लोकसभेवरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु झाल आहे.

शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने 2023 मध्येच बारणे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. त्यानंतर मावळमधून भाजप पक्षाने लढ म्हणून सांगितले तर माझ्यापेक्षा माझे कार्यकर्ते जास्त उत्साही आहेत, असं सांगत माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मावळ लोकसभेवर दावा ठोकला आहे. (Latest Marathi News)

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. मागील 2 टर्म मावळ लोकसभेत शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत. परंतु आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने आणि शिंदे गट महायुती बरोबर गेल्याने मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे असताना दुसरीकडे भाजपने देखील या जागेसाठी दावा केला आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत संधी मिळाली तर कार्यकर्तेच उत्साहाने काम करतील असे सांगितले.

भाजप आणि शिंदे गट मावळच्या जागेवर दावा करत असताना राष्ट्रवादीचा अजित पवार गट देखील मागे नाही. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न करू.

मावळ लोकसभेचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले आहे. यामुळे मावळ लोकसभा जागेवर महायुतीतील कोणता पक्ष बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT