Lok Sabha Saam tv
मुंबई/पुणे

Lok Sabha Election : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ; 'MIM'चा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, लढत तिरंगी होणार

Lok Sabha Latest news : मुंबई उत्तर मध्य लोकसभेच्या या लढाईत आता 'एमआयएम'ने एन्ट्री केली आहे. याबाबत वारीस पठाण यांनी उमेदवाराविषयी माहिती दिली.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापलं आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात दुरंगी लढत होणार, अशी चर्चा होती. या लढाईत आता 'एमआयएम'ने एन्ट्री केली आहे. याबाबत वारीस पठाण यांनी उमेदवाराविषयी माहिती दिली. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांना पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली. वारीस पठाण म्हणाले, 'महाविकास आघाडी एक तरी उमेदवार मुस्लीम देतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातूनअर्ज भरत आहोत. मला सांगितले होते की, तुम्ही लढा. पण मी बोलले होते की प्रचार करेन'.

'ॲडव्होकेट रमजान चौधरी हे या ठिकाणाहून अर्ज करत आहेत. ते आमचे उमेदवार आहेत. एकाला जळगावमधला उमेदवार आणावा लागला आहे. एकाला बाहेरून उमेदवार आणावा लागला आहे. आम्ही त्यांच्या बरोबर इंडीया अलाएन्समध्ये नाही. हे दोघेही सारखेच आहे. बी टीमचा आरोप निराधार आरोप आहे. आम्हाला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. त्याने आम्हाला फरक पडत नाही, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

SCROLL FOR NEXT