Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

Manasvi Choudhary

नवरा- बायकोचे नाते

कोणत्याही संसारात किंवा वैवाहिक आयुष्यात नवरा-बायकोमध्ये भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण हे वाद जर दररोजचे झाले आणि त्यातून मनस्ताप वाढला, तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

Happy Married Life Tips

भांडणे टाळण्यासाठी सोप्या टिप्स

पती-पत्नीमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आणि भांडणे टाळण्यासाठी संसारात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Happy Married Life Tips

बोलण्यापेक्षा समोरच्याचे ऐकून घेण्याची सवय ठेवा

बऱ्याचदा भांडण तेव्हा वाढते जेव्हा दोघेजण एकमेकांचे ऐकून न घेता फक्त स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतात. जोडीदार बोलत असताना शांतपणे त्याचे ऐकून घ्या.

Happy Married Life Tips

रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरू नका

वादाच्या किंवा रागाच्या भरात तोंडून गेलेले वाईट शब्द किंवा जुन्या चुका काढल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाला खोलवर जखम होते. रागात असताना काहीवेळासाठी शांत राहणे महत्वाचे आहे.

Happy Married Life Tips

इगो बाजूला ठेवा आणि सॉरी म्हणायला शिका

नात्यात 'मी मोठा' किंवा 'माझी चूक नाही' हा अहंपणा आणू नका. चूक नसली तरीही नातं वाचवण्यासाठी किंवा विषय मिटवण्यासाठी कधीकधी स्वतःहून सॉरी म्हणा.

Happy Married Life Tips

एकमेकांवर आरोप करणे टाळा

कोणतीही समस्या किंवा अडचण आली की एकमेकांना दोष देण्यापेक्षा तोडगा काढू शकतो यावर चर्चा करा.

Happy Married Life Tips

वाद वेळीच मिटवून टाका

दिवसभर कितीही मोठे खटके उडाले किंवा वाद झाले तरी रात्री झोपताना तो विषय तिथेच संपवून एकमेकांशी प्रेमाने दोन शब्द बोला.

Happy Married Life Tips

NEXT: Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

Tulsi Plant Vastu
येथे क्लिक करा...