किरीट सोमैयांनी जाहीर केली यादी; 'मविआ' सरकारमधील 'या' नेत्यांवरती होणार कारवाई! SaamTV
मुंबई/पुणे

किरीट सोमैयांनी जाहीर केली यादी; 'मविआ' सरकारमधील 'या' नेत्यांवरती होणार कारवाई!

आम्ही घोटाळेबाजाना एक्सपोज़ करीत राहणारच असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैया यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या नावाची यादीच आपल्या ट्विटर वरून प्रसिद्ध केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नारायण राणे विरोधातील ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईला आम्ही घाबरत नाही. आणि आम्ही घोटाळेबाजाना एक्सपोज़ करीत राहणारच असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैया यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या नावाची यादीच आपल्या ट्विटर वरून प्रसिद्ध केली आहे. List announced by Kirit Somaiya; Action will be taken against MVA government leaders

काल भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारने जी अटकेची कारवाई केली त्या अटकेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसैनिक आमने सामने आले अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यालयांच्या तोडफोडी झाल्या तरीही नारायण राणेंची अटक हि भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे अशातच आता भाजपने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना टार्गेट करण्याचा डाव सुरू केला आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी नारायण राणे विरोधातील ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईला आम्ही घाबरत नाही, आणि आम्ही घोटाळेबाजाना एक्सपोज़ करीत राहणारच असे म्हणत अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर यांच्या नंतर अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर कारवाई होणारच असे स्पष्ट संकेत किरीट सोमैयांनी दिले आहेत.

हे देखील पहा-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती टीका केल्याप्रकरणी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महाविकास आघाडी सरकारने अटकेची कारवाई केली अटकेनंतर रात्री राणेंना जामीन मिळाला असला तरी या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे आजच राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आयकर विभागाने कारवाई करत भुजबहाल यांची १०० कोटींची संपत्ती जप्त केली आहे. आणि आता सोमैया यांनी दिलेल्या यादीमुळे महाविकास आघाडी सरकार मधील या मंत्र्यांवर कारवाई होणार कि नाही आणि झाली तरी हि केवळ सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे त्यामुळे राज्याचे राजकारण कोणत्या दिशेला चालले आहे हाच प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT