लाईफलाईन: अवघ्या ६७ मिनिटांत ब्रेन डेड डोनरचे अवयव कल्याणहून मुंबईला पोहोचले प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

लाईफलाईन: अवघ्या ६७ मिनिटांत ब्रेन डेड डोनरचे अवयव कल्याणहून मुंबईला पोहोचले

मुंबईच्या लोकलने ब्रेन डेड डोनरचे अवयव अवघ्या 67 मिनिटांत कल्याणहून मुंबईतील रुग्णालयात पोहोचवत आपली लाईफलाईन ही ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण: मुंबई लोकलला 'मुंबईची लाईफलाईन' अर्थातच जीवन वाहिनीही म्हटलं जातं. मुंबई लोकलने आपले हे 'लाईफलाईन' बिरुद पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ब्रेन डेड झालेल्या डोनरचे अवयव अवघ्या 67 मिनिटांत कल्याणच्या रुग्णालयातून मुंबईतील रुग्णालयात यशस्वीपणे पोहचवत मुंबई लोकलने आपले 'लाईफ लाईन' हे नाव सार्थक करून दाखवले आहे. (Lifeline: Brain dead donor organs reach Mumbai from Kalyan in just 67 minutes by mumbai local)

हे देखील पहा -

कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात असलेल्या ब्रेन डेड व्यक्तीने आपले किडनी आणि लिव्हर हे दोन्ही महत्वाचे अवयव दान केले. मुंबईच्या परळ येथील दुसऱ्या खासगी रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तीला हे अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार होते. मात्र रस्ते वाहतुकीला खड्डे आणि वाहतुक कोंडीचे लागलेले ग्रहण पाहता सध्या मुंबई लोकल ट्रेन हाच सर्वात जलद आणि सुरक्षित पर्याय असल्याचे दिसून आले. त्यामूळे संबंधित रुग्णालयाच्या टिमने कल्याण स्टेशनवर मुंबई लोकल पकडली आणि परळ स्टेशन गाठले आणि तिकडून मग हे अवयव सुरक्षितरित्या परळमधील खासगी रुग्णालयात वेळेवर पोहचवण्यात आले.

कल्याणातील रुग्णालय ते मुंबईतील रुग्णालय प्रवास अवघ्या 67 मिनिटांत पूर्ण करण्यात आला. यासाठी कल्याण आणि दादर रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अधिकारी, कर्मचारी, जीआरपी, आरपीएफ स्टाफनेही विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले. कोरोनामुळे काहीशी घडी विस्कटली असली तरी मुंबई लोकलने पुनः एकदा लाईफलाईन नावाला साजेसे काम करून आपल्याच शिरपेचात मानाचा तुरा रोवला, असे बोलले तर चुकीचे ठरणार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT