Sameer Wankhede
Sameer Wankhede Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: समीर वानखेडेंच्या मालकीच्या हॉटेल-बारला दिलेला परवाना रद्द

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मालकीच्या नवी मुंबईतील (Mumbai) सदगुरु हॉटेल आणि बारला दिलेला परवाना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने आणि फसवणुकीतून मिळविल्याच्या कारणावरून रद्द केला आहे. ठाणे उत्पादन शुल्क अधीक्षक आणि समीर वानखेडे यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर नार्वेकर यांनी वाइन, सौम्य मद्य, स्पिरीट आणि आंबलेल्या मद्य विक्रीसाठी परवानगी दिलेल्या हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा 6 पानी आदेश दिला आहे.

हे देखील पहा -

वानखेडे यांनी २७ ऑक्टोबर 1997 रोजी हॉटेलचा परवाना मिळवल्याची माहिती आढळून आली आहे. 21 वर्षांच्या पात्रतेच्या तुलनेत त्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते, त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी फाइलवर स्वाक्षरी केली असताना, बुधवारी उत्पादन शुल्क आयुक्त आणि समीर वानखेडे यांना आदेश कळविला जाईल, असे सांगण्यात आले आहे. बारचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदी कायद्याचे कलम 54 लागू केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT