लाच घेतल्या प्रकरणी KDMC च्या आयुक्तांना पदावरुन हटवा; मनसेच्या राजू पाटलांचे एकनाथ शिंदेना पत्र प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

लाच घेतल्या प्रकरणी KDMC च्या आयुक्तांना पदावरुन हटवा; मनसेच्या राजू पाटलांचे एकनाथ शिंदेना पत्र

बिल्डर मुन्ना सिंह यांच्याकडून केडीएमसी KDMC आयुक्तांना देण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा

प्रदीप भणगे

डोंबिवली : बिल्डर मुन्ना सिंह यांच्याकडून केडीएमसी KDMC आयुक्तांना देण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी यांनी ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे आणि याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे. दरम्यान मनसे (MNS) आमदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत आयुक्त पदावरुन दूर करा अशी मागणी करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.(Letter from MNS's Raju Patil to Eknath Shinde)

हे देखील पहा-

कल्याण डोंबिवली(Dombivli) महानगरपालिका अधिकारी दिपक शिंदे, अनंत कदम व बिल्डर मुन्ना सिंग यांची हॉटेलमध्ये बसून चर्चा करीत असल्याची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यानंतर बिल्डर मुन्ना सिंग यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवर लाच घेतल्या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत, त्यासंबंधीही क्लिप व्हायरल (viral clip) होत आहे. या प्रकरणी मुन्ना सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार कडोंमपाच्या वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी दावडी येथील अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी लाच घेतल्याचा दावा केला आहे. मुन्ना सिंग यांनी क्लिपद्वारे सविस्तर माहिती दिल्याप्रमाणे दिपक शिंदे व अनंत कदम यांनी प्रत्येकी १ लाख व कडोंमपा आयुक्तांना देण्यासाठी २५ लाख असे २७ लाख उकळल्याचा आरोप केला आहे. बिल्डरने वरील लाच प्रकरणात केडीएमसीचे आयुक्तांचे नाव घेणे हे अत्यंत गंभीर असून महानगरपालिकेच्या नावाला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे महानगरपालिकेची बदनामी होत आहेच पण महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी स्थानिक रहिवासी, विकासकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

दरम्यान केडीएमसी आयुक्तांनी केलेल्या विधानामध्ये 'माझ्याकडे कोणहीती तक्रार आलेली नाही, मात्र या संदर्भात चौकशीनंतर संबंधिताच्या विरोधात निश्चितपणे कारवाई करण्यात येईल' अशी सारवासारव केल्याचे दिसून येते.वास्तविक बिल्डर मुन्ना सिंग यांनी शिंदे व कदम यांनी मा.आयुक्तांना देण्यासाठी पैसे घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून अशाप्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी लाच घेत असून कालच पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याला लाच लुचपत विभागाने पकडले आहे. अधिकृत बिल्डरकडून प्लान पास करण्यासाठी प्रति चौ.फू.७५ रुपये घेतले जातात अशीही चर्चा आहे. तिच बाजू गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या घटनांवरुन उघडकीस आली आहे. यामागे आयुक्तांचा हात असल्याची चर्चा असून चौकशीची मागणी होत आहे.तरी आपण याबाबत तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल करावा आणि यासर्व प्रकरणाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे आणि याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे. दरम्यान मनसे आमदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत आयुक्त पदावरुन दूर करा अशी मागणी करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

SCROLL FOR NEXT